

नाशिक : अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मनस्ताप थांबण्याचे नाव नाहीे. प्रवेश प्रक्रियासुरु झाल्यानंतर पाचव्या दिवशीही, वेबसाईट ठप्प हाेणे, वेबसाईट संथ चालणे, लॉगिन आयडी पासवर्ल्डचे संदेश प्राप्त न होते असे तंत्र गोंधळाचे 'प्रक्रिये'मुळे विद्यार्थी हैराण झाल्याचे दिसून आले.
अकरावी प्रवेश प्रक्रियेला नव्याने सोमवार(दि.२६्) पासून सुरुवात झाल्यानंतरही वेबसाईटचा तांत्रिक घोळ थांबण्याचे नाव नाही. प्रवेशासाठी राज्यभरातील लाखो विद्यार्थी शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर नोंदणीसाठी सहभागी होत आहे. मात्र, वेबसाईटचे कार्य संथ होणे, लॉगिन आयडी आणि पासवर्ल्डचे संदेश प्राप्त न हाेणे, अथक प्रयत्नांनी ते संदेश आल्यानंतर अन्य कोणील लॉगिन केल्याचा संदेश मिळणे अशा तंत्र समस्यांमुळे विद्यार्थी-पालक त्रस्त झाले आहेत.
२६ मे नंतर काही दिवसात वेबसाईट सुरु होईल आणि प्रवेशाचा पहिला टप्पा नोंदणीने यशस्वी येईल, अशी विद्यार्थ्यांना आशा हाेती. मात्र ती सपशेल फोल ठरत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. ज्या विद्यार्थींनी प्रवेशाचा पहिला भाग भरला, त्यांना दुसरा भाग वेबसाईट दाखवत नसल्याचेही 'एरर' वाढल्या आहेत. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच होणाऱ्या केंद्रिय अॉनलाईन प्रक्रियेसाठी राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने पुरेशी तयारी केली नसल्याचे उघड झाले आहे.
जिल्हा ( नोंदणी )
नाशिक - ३६,१२७
धुळे - १२,३७०
जळगाव - २१,२३५
नंदुरबार - ८,१९०
दरम्यान, शुक्रवारी(दि.३०) सायंकाळी ५.३० पर्यंत नाशिक जिल्ह्यात ३६ हजार १२७ विदयार्थ्यांनी प्रवेश नोंदणी केली. त्यातील ३२ हजार २९४ विद्यार्थ्यांनी प्रवेशाचे शुल्क अदा केले, तर ३१ हजार २१० विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा भाग एक यशस्वी पूर्ण केला. २६ हजार ७३५ विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा दुसरा भाग भरून दिला. म्हणजे भाग-१ आणि भाग-२ मध्ये एका दिवसात ४ हजार ५३५ इतका फरक दिसून आला. हा फरक अर्थातच वेबसाईटमधील तांत्रिक दोषांमुळे उद्भवला आहे.