

नाशिक : म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी घरफोडी झाली असून चोरट्यांनी २४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. पहिल्या घटनेत किशोर सुर्यवंशी मार्गावरील जुईनगर परिसरात चोरट्याने लता नामदेव पवार यांच्या घरात २ ते ३ जुलै दरम्यान घरफाेडी केली. चोरट्याने घरातील साडेतीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि साडेतीन हजार रुपयांची रोकड असा एकूण नऊ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
तर दुसऱ्या घटनेत श्रीकांत दीपक पाटील (२१, रा. दिंडोरी रोड) यांच्या घरात बुधवारी (दि. ६) सकाळी साडेनऊच्या सुमारास चाेरट्याने घरफोडी करून घरातील सोन्याचांदीचे दागिने आणि रोकड असा १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस तपास करीत आहेत.