नाशिक : इमारतीवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

नाशिक : इमारतीवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

नाशिक (सिन्नर): पुढारी वृत्तसेवा
येथील प्रकाशनगर येथे नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडून 34 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राघीच साह (रा. बिहार) असे मृत कामगाराचे नाव आहे. प्रकाशनगर येथे एका पाच मजली इमारतीचे काम सुरू असून हा कामगार पाचव्या मजल्यावर काम करत होता. यावेळी तोल जाऊन तो खाली पडल्याने त्याला गंभीर मार लागला. सोबतच्या कामगारांनी त्याला नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नाईक चेतन मोरे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news