नाशिक : कामटवाडे परिसरात पाणीपुरवठा सुरळीत

सिडको : शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा सत्कार करताना पवन मटाले, प्रकाश अमृतकर, वसंतराव कमानकर, बाळू गवळी, विश्वास जाधव, सुरेश बागूल आदींसह महिला.  (छाया : राजेंद्र शेळके)
सिडको : शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा सत्कार करताना पवन मटाले, प्रकाश अमृतकर, वसंतराव कमानकर, बाळू गवळी, विश्वास जाधव, सुरेश बागूल आदींसह महिला. (छाया : राजेंद्र शेळके)

सिडको : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना महानगरप्रमुखांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सिडकोतील अंबिकानगर, कामटवाडे परिसरात नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा होऊ लागल्याने परिसरातील महिलांनी समाधान व्यक्त केले.

सिडकोसह अंबिकानगर आणि कामटवाडे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवू लागल्याने शिवसेना महानगरप्रमुख व माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्याकडे कैफियत मांडली. त्यांनी महापालिका अधिकारी गोकुळ पगारे यांना तातडीने पाचारण करून त्यांच्यासमवेत परिसराची पाहणी केली. त्यावेळी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन पगारे यांनी दिले. आता या भागात नियमित पाणीपुरवठा होण्यास प्रारंभ झाल्याने परिसरातील महिलांनी बडगुजर यांचा सत्कार केला. यावेळी पवन मटाले, प्रकाश अमृतकर, वसंतराव कमानकर, बाळू गवळी, विश्वास जाधव, चंद्रकांत बोडके, हरिभाऊ कुलकर्णी, रवि निकम, सुरेश बागूल, दादासाहेब शेवाळे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news