नाशिक : यंदा उन्हाळ कांद्याचा दर दोन हजारांच्या आतच

नाशिक : यंदा उन्हाळ कांद्याचा दर दोन हजारांच्या आतच
Published on
Updated on

नाशिक, नांदगाव : पुढारी वृत्तसेवा

यंदाच्या वर्षी उन्हाळ कांदादरात अपेक्षित वाढ झाली नसून त्यातच भाववाढीच्या अपेक्षेने साठवून ठेवलेला कांदा चाळीतच मोठ्या प्रमाणात खराब होऊ लागल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. यंदाच्या वर्षी उन्हाळ कांद्याचा दर दोन हजार रुपयांच्या आतच राहिल्याने खर्चदेखील वसूल होणे मुश्कील झाले आहे.

कांदा या पिकावर शेतकरीवर्गाचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. सुरुवातीला चांगले बाजारभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची साठवण करण्यात आली होती. परंतु आता सहा महिने उलटत आले तरी बाजारभावात सुधारणा होत नसल्याने साठवून ठेवलेल्या कांद्याची शेतकऱ्यांकडून नाईलाजाने विक्री करण्यात येत आहे. साठवून ठेवलेला कांदादेखील खराब झाल्याने शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

रोप तयार करण्यापासून ते कांदा लागवड, निंदणी, काढणी ते चाळीत साठवण करण्यापर्यंत कांदापिकाची मोठी प्रक्रिया करावी लागते. त्यात वाढती मजुरी, वाढते खतांचे दर, कीटकनाशकांमुळे कांदा पिकवण्यास मोठा खर्च होतो. सध्याच्या बाजारभावाने खर्चदेखील वसूल होणे हालाखीचे झाले आहे. शासनाने कांदा दरासंदर्भात पिकाबाबत कायमचा ठोस निर्णय घेण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.

कांदापीक घेण्यासाठी एकरी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च होतो. अनेक दिवस कांदा साठवून ठेवला असता आता तो मोठ्या प्रमाणात खराब झाला. सध्याच्या बाजारभावाचा विचार करता हातात काहीही शिल्लक राहत नाही.

– परसराम शिंदे, शेतकरी, भालूर

कांदा बाजारभावासंदर्भात केंद्र शासनाकडून ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे. पंरतु तसे होत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर बाजारभावाबाबत नेहमीच अन्याय होतो.

– शरद जाधव, शेतकरी, गंगाधरी

● तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र : १२५०० हेक्टर

● एप्रिल २०२२ ते १२ सप्टेंबरपर्यंत नांदगाव बाजार समितीत झालेली आवक ( क्विंटलमध्ये) मिळालेले बाजारभाव पुढीलप्रमाणे :

● एप्रिल : आवक : २,८५,८८४. कमीत कमी दर : १००. जास्त : ११२५. सरासरी ५७५.

● मे : आवक : ३,२९,४५९. कमीत कमी दर : १००. जास्त : ११७५. सरासरी : ६००

●जून : आवक : २,८६,०२७. कमीत कमी दर : १००. जास्त : १५२६. सरासरी १०५०

●जुलै : आवक : २,२१,२१६. कमीत कमी दर : १००. जास्त : १४४५. सरासरी १०००

●ऑगस्ट : आवक : २,४८,८७४. कमीत कमी दर : १००. जास्त : १५००. सरासरी १०००

● सप्टेंबर १२ पर्यंत आवक : ८६,१६७ कमीत कमी दर : १००. जास्त : १३७५ सरासरी : ९५०

एकूण विक्री झालेला कांदा १४,५७,

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news