नाशिक : वीज असून अडचण, नसून खोळंबा…अनिश्चित भारनियमन

नाशिकरोड : अनियमित भारनियमाना संदर्भात मुख्य अभियंता दिपक कुमठेकर व अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांना निवेदन देताना सर्व पक्षीय शिष्टमंडळाचे जगन्नाथ आगळे, गणेश गायधनी, दिपक गायधनी, दिलीप गायधनी, भास्कर गायधनी, विष्णूपंत गायधनी आदीसह शेतकरी व ग्रामस्थ ( छाया : उमेश देशमुख )
नाशिकरोड : अनियमित भारनियमाना संदर्भात मुख्य अभियंता दिपक कुमठेकर व अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांना निवेदन देताना सर्व पक्षीय शिष्टमंडळाचे जगन्नाथ आगळे, गणेश गायधनी, दिपक गायधनी, दिलीप गायधनी, भास्कर गायधनी, विष्णूपंत गायधनी आदीसह शेतकरी व ग्रामस्थ ( छाया : उमेश देशमुख )
Published on
Updated on

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड पूर्व भागातील गावांमधे पुन्हा वीजेचा लपंडाव सुरू झाला असून अनिश्चित भारनियमन पळसे पंचक्रोशीत सुरु आहे. पाऊस लांबला असून उन्हाच्या झळा सोसतांना रात्रीच्या वेळी विज नाही. त्यात परिसरात बिबट्याच्या भितीने घराबाहेर पडणे म्हणजे मृत्युला सामोरे जाण्यासारखी परिस्थिती ओढवल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात बुधवारी (दि.21) पळसेगावच्या शेतकरी व ग्रामस्थांनी वीज मंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर व अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर याची भेट घेऊन अनिश्चित वीजपुरवठा संदर्भात असणाऱ्या समस्यांचा पाढा वाचत निवेदन सादर केले. तातडीने येथील समस्या सोडवा अन्यथा आदोंलन करण्याचा इशारा अधिका-यांना चर्चेदरम्यान शेतकऱ्यांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने दिला. लाईट असुन अडचण, नसुन खोळंबा अशी परिस्थिती येथे निर्माण झाल्याचे निवेदनाव्दारे सांगण्यात आले आहे.

पळसे गावासह परिसरात वीजपुरवठा अनियमित होत असल्याने संबंधित लाईनमन अथवा अधिका-यांशी दूरध्वनी किंवा प्रत्यक्ष भेटून विचारणा केली असता थेट एकलहरे पाॅवर हाऊसवरुनच आपत्कालीन भारनियमन असल्याचे सांगून वेळ मारुन नेण्याचे काम वीज मंडळाचे संबंधित अधिकारी, कर्मचारी करत असतात. कधी कधी तर साधा एखाद्या डीपी वरचा फ्युज गेला तर तो देखील लाईनमन टाकायला वेळेवर येत नाहीत. उलटपक्षी दूरध्वनी बंद करुन ठेवतात. वाॅर्ड क्र.३ मध्ये एकमेकांना चिटकणा-या विजतारामुळे तर स्ट्रीट लाईटचे (पथदिवे) मिटर, फ्यूज व वायरी या सर्व शाॅटसर्किटने जळून गेले आहेत. तसेच पावसाळा तोंडावर आला असता शेतात लोंबलेल्या तारा व वाकलेले पोल परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे संभाव्य धोका जाणवत आहे. लोंबणा-या वीजतारांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करुन पळसेसह पंचक्रोशीतील नागरिकांना समस्या मुक्त करावे अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. याबाबत अधिक्षक अभियंता पडळकर यांनी तातडीने ॲक्शन मोडवर येत संबंधित अधिकारी वर्गाला दूरध्वनी करत तातडीने पळसेकरांच्या विजेच्या तक्रारीकडे लक्ष घालून त्या सोडवा अन्यथा जनतेचे कामे होत नसेल तर बदली करु अशा सूचना दिल्या आहेत. तसेच दोन दिवसात अडचण दूर करा नाहीतर कारवाईला सामोरे जा असे खडे बोल सुनावले. यावेळी शिवसेनेचे (उबाठा) उपजिल्हाप्रमुख जगन्नाथ आगळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गायधनी, माजी सरपंच दिपक गायधनी, सुरेश गायधनी, दगुदादा गायधनी, बाळासाहेब गायधनी, दिलीप गायधनी, भास्कर गायधनी, शिवाजी टावरे, गणपत गायधनी, रुपेश ढेरिंगे, विष्णूपंत गायधनी, जयवंत गायधनी आदींसह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news