नाशिक : पादचारी महिलेची सोनसाखळी ओरबडली

नाशिक : पादचारी महिलेची सोनसाखळी ओरबडली

नाशिक : पादचारी महिलेची सोनसाखळी ओरबडल्याची घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगिता साहेबराव बुटें (४२, रा. गोकुळ पार्क, पाथर्डी फाटा) ह्या रस्त्याने पायी जात होत्या. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी बुटें यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून पोबारा केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला प्रवाशाचे दागिने लांबविले

नाशिक : रिक्षा प्रवासात महिला प्रवाशाचे बॅगसह दागिने लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाबाई कचरू सांगळे (५४, रा. रामकृष्णपार्क, उंटवाडी) ह्या सीबीएस ते उंटवाडी असार प्रवात करत होत्या. रिक्षातील सहप्रवाशांनी सांगळे यांना बोलण्यात गुंतवून ९७ हजार ५०० रूपये किमंते सोन्याचे दागिने, बॅक पासबुक व एटीएम कार्ड बॅगेतून काढून घेतले. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news