नाशिक : लासलगावला मोहरमनिमित्त थंडपेयाचे वाटप

लासलगाव : थंडपेयाचे वाटप करताना मुस्लीम फाउंडेशनचे पदाधिकारी. (छाया : राकेश बोरा)
लासलगाव : थंडपेयाचे वाटप करताना मुस्लीम फाउंडेशनचे पदाधिकारी. (छाया : राकेश बोरा)
Published on
Updated on

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

येथील मुस्लीम फाउंडेशनच्या वतीने मोहरमनिमित्त थंडपेय (सबिल) वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील मेनरोड येथील पै. शेख महंमद दादामिया मार्ग येथे हा उपक्रम राबविण्यात आला. मुस्लीम फाउंडेशनच्या समाजबांधवांनी मोहरम सणानिमित्त हिंदू-मुस्लीम बांधवांना थंडपेयाचे वाटप करून मानवतेचा व शांततेचा संदेश दिला.

इस्लाम धर्माचे संस्थापक मोहंमद पैगंबर यांना व त्यांच्या मानवता व नैतिकतेच्या तत्त्वांचे स्मरण करून पैगंबर साहेबांचे नातू हजरत इमाम हुसेन तसेच त्यांच्या नातेवाइकांनी यसजीद नावाच्या राजाच्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढा दिला. तसेच बगदाद येथील करबला येथे यसजीद या हुकूमशहाच्या अत्याचाराविरुद्ध लढा देताना हजरत इमाम हुसेन हे शहीद झाले होते. हा महिना मोहरमचा होता. या युद्धात त्यांना पंधरा दिवस पाण्यापासून वंचित राहावे लागले होते. त्यांनी केलेल्या त्याग आणि बलिदानाची आठवण म्हणून मोहरम साजरा केला जातो. त्यांच्या स्मृतिनिमित्त थंडपेयाचे वाटप करण्याची परंपरा ठिकठिकाणी जपली जात आहे. यावेळी मौलाना फारुक अशरफी, मौलाना महमूद आलम, हाफिझ तौफिक तसेच मुस्लीम फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news