नाशिक : देवळ्याच्या नगराध्यक्षपदी सुलभा आहेर

देवळा : नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुलभा आहेर व उपनगराध्यक्ष अशोक आहेर यांचा सत्कार करताना
माजी नगराध्यक्षा धनश्री आहेर. समवेत नगरसेवक आदी. (छाया : सोमनाथ जगताप)
देवळा : नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुलभा आहेर व उपनगराध्यक्ष अशोक आहेर यांचा सत्कार करताना माजी नगराध्यक्षा धनश्री आहेर. समवेत नगरसेवक आदी. (छाया : सोमनाथ जगताप)
Published on
Updated on

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
देवळा नगराध्यक्षपदी सुलभा जितेंद्र आहेर, तर उपनगराध्यक्षपदी अशोक संतोष आहेर यांची बिनविरोध निवड झाली. तत्कालीन नगराध्यक्षा भारती आहेर व उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने रिक्तपदी नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडीसाठी गुरुवारी (दि. 29) सकाळी 10 ला तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीच्या सभागृहात नगरसेवकांची विशेष सभा घेण्यात आली.

त्यात नगराध्यक्षपदासाठी सुलभा जितेंद्र आहेर व उपनगराध्यक्षपदासाठी अशोक संतोष आहेर या दोघांचा निर्धारित वेळेत एक – एक उमेदवारी अर्ज दाखल झाला. सुलभा आहेर यांच्या अर्जावर सूचक म्हणून सुनंदा आहेर आणि अनुमोदक म्हणून शीला आहेर यांची, तर उपनगराध्यक्ष आहेर यांच्या अर्जावर सूचक म्हणून मनोज आहेर व अनुमोदक म्हणून करण आहेर यांची स्वाक्षरी होती. अर्जाची छाननी होऊन तो वैध ठरून दोघांची निवड झाल्याची घोषणा पीठासीन अधिकारी सूर्यवंशी यांनी केली. मुख्याधिकारी नितीन बागूल यांनी त्यांना सहाय केले. नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी पाचकंदील परिसरात फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. बैठकीस भाजपचे गटनेते संजय आहेर, नगरसेवक कैलास पवार, भूषण गांगुर्डे, सुनंदा आहेर, भाग्यश्री पवार, रत्ना मेतकर, अश्विनी चौधरी, राखी भिलोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते संतोष शिंदे, ऐश्वर्या आहेर आदी सर्व नगरसेवक उपस्थित होते. मजूर फेडरेशनचे नवनिर्वाचित संचालक सतीश सोमवंशी, माजी सरपंच भाऊसाहेब पगार, माजी नगराध्यक्षा धनश्री आहेर, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार, लक्ष्मीकांत आहेर, भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, किशोर आहेर, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, डॉ. प्रशांत निकम, अनिल आहेर, अमोल आहेर, मुन्ना अहिरराव, माजी सरपंच नदिश थोरात, प्रदीप आहेर, चंद्रकांत आहेर, डॉ. कोमल निकम, डॉ. अविनाश आहेर आदींनी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले. नूतन पदाधिकार्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. शहराच्या विकासासाठी तसेच 'स्वच्छ देवळा – सुंदर देवळा' संकल्पनेच्या पूर्ततेसाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही नूतन नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांनी दिली.

सुलभा आहेर उपसरपंच ते थेट नगराध्यक्षा
माजी सरपंच तथा उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर यांनी 20 वर्षांपूर्वी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. सतत चार पंचवार्षिक कामाच्या जोरावर निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. उपसरपंच, प्रभारी सरपंचपद भूषविले. नंतर ग्रामपालिकेची सत्ता मिळवित त्यांच्या सुविद्य पत्नी सुलभा आहेर यांना उपसरपंच केले. मध्यंतरी ग्रामपालिकेचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. गतवर्षी झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत आहेर द्वयींनी विक्रमी मतांनी विजय मिळविला. नगराध्यक्षपद महिला राखीव असल्याने जितेंद्र आहेर यांनी एक वर्षासाठी उपनगराध्यक्षपद भूषविले. आज त्यांच्या पत्नी सुलभा या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news