

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा येथील माळेगाव एमआयडीसी मधील भावेश पॉलिमर या कंपनीच्या आवारातील स्क्रॅप मटेरियलला (गुरुवार) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली.
माळेगाव एमआयडीसी व सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशमन बंबांकडून आग विझवण्याचे प्रयत्न चालू आहेत. माळेगाव अग्निशामक दल आणि सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशमन बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र भीषण आगीमुळे आग आटोक्यात येण्यासाठी यंत्रणेने कसोशीणे प्रयत्न केला.