नाशिक : राहुल जगतापच्या आर्थिक व्यवहारांवर तपास केंद्रीत, पत्नीचीही चौकशी ; धक्कादायक खुलासे

राहुल जगताप
राहुल जगताप
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मालमत्ता हडप करण्यासाठी पितापुत्रांचे खुन करण्याचा आरोप असलेल्या संशयित राहुल गौतम जगताप (३६, रा. जुनी पंडित कॉलनी) याच्या आर्थिक व्यवहारांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. प्राथमिक तपासात राहुलचे बँक खाते नसल्याचे समोर येत आहे. तसेच नानासाहेब कापडणीस यांचे शेअर्स विकून आलेले पैसे इतरांना देत त्यांच्यामार्फत गुंतवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे.

अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी राहुलने नानासाहेब व डाॅ. अमित कापडणीस यांचा खुन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोघांचा खून करून राहुलने अनेक आर्थिक व्यवहार केले. मात्र हे व्यवहार नानासाहेब कापडणीस यांच्यासह त्याच्याकडील कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामार्फत केल्याचे समोर आले आहे. राहुलचे स्वत:च्या नावे एकही बँक खाते नसल्याचे समोर येत आहे. शेअर्स विक्रीतून आलेले पैसे इतरांना देत त्यांच्या मार्फत राहुलने गुंतवणूक केल्याचा संशय आहे. त्यात राहुलने त्याच्या पत्नीलाही काही पैसे देत गुंतवणूक केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी त्या दृष्टीने तपासास सुरुवात केली असून पत्नीचीही चौकशी केली आहे.

नदीपात्रात पुरावे नष्ट

डॉ. अमित कापडणीस यांचा खुन केल्यानंतर अमित यांचे कपडे, गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू संशयित राहुल याने तेथील नदीपात्रात फेकल्या. सरकारवाडा पोलिसांच्या पथकाने साेमवारी (दि.२१) राजुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटनास्थळास भेट देत पाहणी केली. मात्र तेथून ठोस पुरावे हाती लागले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news