नाशिक : पोटखराबा वर्ग क्षेत्र लागवडीयोग्य होणार; सहभागी होण्याचे तहसीलदारांचे आवाहन

नाशिक : पोटखराबा वर्ग क्षेत्र लागवडीयोग्य होणार; सहभागी होण्याचे तहसीलदारांचे आवाहन
Published on
Updated on

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
दिंडोरी तालुक्यात अनेक शेतकर्‍यांच्या 7/12 उतार्‍यावर काही क्षेत्राची पोटखराबा म्हणून नोंद झाली आहे. भूसुधारणा करून शेतकर्‍यांनी हे क्षेत्र लागवडीखाली आणले आहे. उतार्‍यावर मात्र त्याची नोंद पोटखराबा अशीच आहे. या क्षेत्राची उतार्‍यावर प्रत्यक्षात लागवडीखालील क्षेत्रात नोंद करण्याची मोहीम दिंडोरी तहसील कार्यालयाने हाती घेतली आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांनी या मोहिमेत सहभागी होऊन सातबारा सदरी क्षेत्राची नोंद करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार पंकज पवार, नायब तहसीलदार संगमित्रा बाविस्कर, वरखेड मंडळ अधिकारी प्रीती अगरवाल यांनी केले आहे.

मंडळमध्ये पोटखराबासाठी मंडळ कार्यालय येथे शिबिर ठेवले होते. शिबिरात 120 प्रस्ताव तयार करून पाठवले आहेत. दिंडोरी तालुका एकूण प्राप्त प्रस्ताव संख्या 1442 प्राप्त झाले असून, प्रस्तावावर तहसील कार्यालय, भूमिअभिलेख आणि प्रांत ऑफिसमार्फत कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत 25 गावांचे एकूण 113 प्रस्ताव मंजूर होऊन आदेश झाले आहेत. बाकी प्रस्तावांवर कार्यवाही सुरू आहे. पोटखराबा अशी नोंद झालेले क्षेत्र अनेक शेतकर्‍यांनी लागवडीखाली आणले आहे. परंतु, सुधारणा केलेल्या लागवडीयोग्य क्षेत्राच्या नोंदी 7/12 उतार्‍यावर न घेतल्यामुळे शेतकर्‍यांना त्या क्षेत्रावर पीककर्ज, पीकविमा अथवा नैसर्गिक आपत्तीची नुकसानभरपाई, असा कोणताही फायदा मिळत नाही.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news