Nashik : दिंडोरी मॅरेथॉनमध्ये धावले एक हजार धावपटू, कुणी मारली बाजी?

दिंडोरी,www.pudhari.news
दिंडोरी,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

येथील राजाश्रय फाउंडेशन व डॉक्टर असोसिएशन यांच्या वतीने दिंडोरी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. त्यात दिंडोरीकरांसह नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, मुंबई आदी जिल्ह्यातील एक हजार धावपटूंनी सहभाग घेतला.

निसर्गरम्य वातावरणात संस्कृती लॉन्स येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार पंकज पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ज्ञान राजे, उपाध्यक्ष डॉ. रविंद्र ढवण, उपनगराध्यक्ष लता बोरस्ते, माधव साळुंखे, प्रमोद देशमुख, अनिल देशमुख, सुजित मुरकुटे, कैलास मवाळ, मनोज ढिकले, श्याम हिरे, सोमनाथ जाधव, योगेश देशमुख, आयर्न मॅन डॉ. अरुण गचाले, आदींच्या उपस्थितीत स्पर्धेत सुरुवात करण्यात आली.

यावेळी प्रथमच दिंडोरीत मॅरेथॉनचे आयोजन केल्याने दिंडोरीकरांनी उस्फूर्त प्रतिसाद देत स्पर्धेत सहभाग नोंदविला. यावेळी आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका अथरे म्हणाल्या की, मॅरेथॉनच्या निमित्ताने अनेक खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील धावपटूंनी सरावाला महत्त्व देऊन विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विजयी धावपटूंना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राजश्री देशमुख, हंसराज देशमुख, शिव राजे, निलेश देशमुख, डॉ. विलास देशमुख, डॉ. संदीप गोसावी, डॉ.दीपक बागमार आदी उपस्थित होते. यावेळी राजश्री देशमुख व डॉ उत्तम वडजे यांनी सहभागी स्पर्धकांचे आभार व्यक्त केले.

या धावपटूंनी मारली बाजी

दहा किमी पुरुष

प्रथम रोहित यादव
द्वितीय दयानंद चौधरी
तृतीय सिकंदर तडाखे

महिला
प्रथम आरती पावरा
द्वितीय अंजली पंडित
तृतीय राजश्री सोनवणे

पाच किमी पुरुष
प्रथम बबलू बिन्नर
द्वितीय श्रीराम चौधरी
तृतीय दीपक गायकवाड

महिला
प्रथम वेदिका मंडलिक
द्वितीय भाग्यश्री गवळी
तृतीय कोमल गायकवाड

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news