नाशिक : पद्मभूषण रमेश भटकर यांचा सत्कार करताना नितीन दहिवेलकर, योगेश राणे, योगेश मालपुरे, संजय दुसे, संजय बागड, महेश पितृभक्त आदी. 
नाशिक : पद्मभूषण रमेश भटकर यांचा सत्कार करताना नितीन दहिवेलकर, योगेश राणे, योगेश मालपुरे, संजय दुसे, संजय बागड, महेश पितृभक्त आदी. 

नाशिक : प्रतिभाशील उद्योजकांची गरज : पद्मभूषण विजय भाटकर

Published on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आज सर्वच क्षेत्रांचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. विशेषत: शिक्षणक्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. अगदी मंदिरात भरणारी गावातील शाळा आता मोठमोठ्या इमारतीत भरविली जात आहे. सर्वत्र संगणकीकरण झाले आहे. ही परिस्थिती चिरकाल टिकण्यासाठी तसेच भविष्यातील आव्हाने सहज पेलण्यासाठी प्रतिभाशील उद्याेजकांची गरज असल्याचे प्रतिपादन पद्मभूषण विजय भाटकर यांनी केले.

मविप्र शिक्षणसंस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात कॉलेजरोड, गंगापूर रोड मित्रमंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिक्षणविश्व व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी एसएमबीटी शिक्षणसंस्थेचे विश्वस्त आमदार डॉ. सत्यजित तांबे, वेस्टर्न रेल्वेचे मुख्य ट्रान्स्पोर्टेशन व्यवस्थापक नरेंद्र पाटील, मर्चंट नेव्हीचे कॅप्टन अतुल इंदूरकर यांची व्याख्याने झाली. याप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितीन दहिवेलकर, अध्यक्ष योगेश राणे, विश्वस्त योगेश मालपुरे, उपाध्यक्ष संजय दुसे, संजय बागड, सरचिटणीस महेश पितृभक्त आदी उपस्थित होते. भटकर म्हणाले की, 'शिक्षणविश्व झपाट्याने बदलत आहे. स्वातंत्र्यानंतर शाळांची स्थिती बदलली आहे. देशात सात लाख खेड्यांत १५ लाखांपेक्षा अधिक शाळा तर बाराशेपेक्षा अधिक विद्यापीठे निर्माण झाली आहेत. त्याचबरोबर आयटी, आयआयटीसारख्या शिक्षणसंस्था उभ्या राहिल्या आहेत. संगणकाच्या संशोधनानंतर शिक्षणविश्व बदलल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश राणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र कोठावदे, नीलेश मकर, हितेश देव, भगवंत येवला, अ‍ॅॅड. देवदत्त जायखेडकर, संचालक प्रवीण अमृतकर, पवन बागड, हर्षद चिंचोरे, अमोल शेंडे, अविनाश कोठावदे, सुधीर नावरकर, प्रशांत मोराणकर, चेतन येवला, राकेश ब्राह्मणकर आदींनी प्रयत्न केले.

यश पुरस्कारांचे वितरण : मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी परीक्षेत अमृता जान्हवी तर इयत्ता बारावी परीक्षेत श्रेया भदाणे या विद्यार्थिनींनी चांगले गुण मिळवून समाजाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते यश पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news