नाशिक : ‘आम्ही नादार झालो घरी मरण्यापेक्षा शासनदरबारी मरु’… शेतकऱ्यांचा निर्धार

उगाव : येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करताना संतप्त शेतकरी. 
उगाव : येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करताना संतप्त शेतकरी. 

नाशिक (उगांव, ता.निफाड) : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनी जप्तीच्या कारावाईविरोधात शेतकरी संतप्त झाले आहेत. राज्य शासनाने विशेष पॅकेज देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. याकरिता उपोषणाचा निर्णय घेत शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या शेती विरोधी धोरणामुळे शेतकरी पूर्णत: कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे उगांव येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी 'आंम्ही नादार झालो ही सामुदायिक शपथ घेत घरी मरण्यापेक्षा सरकार दरबारी उपोषण करून मरू'. असा निर्धार केला आहे. यावेळी‌ शेतकरी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भगवान बोराडे, शेतकरी संघर्ष संघटना जिल्हा अध्यक्ष सुधाकर मोगल, तुषार गांगुर्डे, दत्ताजी गवळी, गंगा शिंदे,अब्दुल शेख, दत्तू सुडके, प्रभाकर मापारी,बाळासाहेब ढोमसे,मोतीनाना पानगव्हाणे,नंदू चव्हाण, विजय मापारी आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news