नाशिक : जय भवानी रोडवर बिबट्याचे दर्शन ; नागरिकांत घबराट

नाशिक : जय भवानी रोडवर बिबट्याचे दर्शन ; नागरिकांत घबराट

नाशिक; पुढारी ऑनलाईन : येथील जय भवानीरोड परिसरात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास शिवसेनेचे कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड यांच्या घराच्या पाठीमागच्या जागेवर बिबट्या दिसला असल्याची माहिती मिळाली आहे. बंगल्याच्या पार्किंगमध्ये बिबट्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

काही महिलांनी सकाळी या बिबट्याला पाहिले व आजूबाजूच्या नागरिकांना सांगितले. नाशिकमध्ये याआधीही वेगवेगळ्या भागात अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. सकाळी पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. बिबट्या दिसताच कुत्रे भूंकू लागल्याने बिबट्या तेथून पसार झाला. याबाबत वनविभागाला कळविण्यात आले आहे. तसेच जय भवानी रोडवरील वनविभागतर्फे बिबट्याचा शोध सुरु आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news