Nashik : निफाड तालुक्यात आता ‘इतक्या’ रुपयांनी महागणार दळण

Nashik : निफाड तालुक्यात आता ‘इतक्या’ रुपयांनी महागणार दळण
Published on
Updated on

नाशिक (ओझर)  : पुढारी वृत्तसेवा

पीठगिरणीच्या स्पेअरपार्टचे दर वाढल्यामुळे एक मार्चपासून दळणाचा दर किलोला चारऐवजी पाच रुपये करण्याचा निर्णय निफाड तालुका पीठगिरणी संघटनेने घेतला.

निफाड तालुक्यातील गिरणीमालक व कामगारांची बैठक येथील कालिकामाता मंदिरात झाली. याप्रसंगी मसाला, भातगिरणी कामगार महासंघाचे राज्य अध्यक्ष अशोक सोनवणे उपस्थित होते. बैठकीत तालुकाध्यक्षपदी उमेश रासने यांची एकमताने निवड करण्यात आली‌. सल्लागारपदी सुरेश शेलार (चितेगाव) व असलम पठाण (उगाव खेडे) यांची वर्णी लागली. उपाध्यक्षपदी भाऊसाहेब पवार (लासलगाव), सचिवपदी योगेश जगताप (लासलगाव), कोषाध्यक्ष सुनील शिंदे (लासलगाव), कार्याध्यक्ष पठाण, महासचिव सुरेश व्यवहारे (विंचूर), संपर्कप्रमुखपदी रमेश गायकवाड (निफाड), संपर्कप्रमुख मनोज काळे (सुकेणा), संघटक संजय कुंभार्डे (नांदुर्डी), विजय विष्णू उगले (कारसूळ) यांची निवड झाली.

ओझर : निफाड तालुका पीठगिरणी संघटनेच्या वतीने माजी आमदार अनिल कदम यांना देताना राज्य अध्यक्ष अशोक सोनवणे, तालुकाध्यक्ष उमेश रासणे
ओझर : निफाड तालुका पीठगिरणी संघटनेच्या वतीने माजी आमदार अनिल कदम यांना देताना राज्य अध्यक्ष अशोक सोनवणे, तालुकाध्यक्ष उमेश रासणे

घरघंटीमुळे गिरणी व्यवसाय अडचणीत आलेला आहे. त्यातच वीजबिल व स्पेअरपार्टचा भाव वाढला. त्यामुळे दळणाचे भाव वाढवून द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी माजी आमदार अनिल कदम व महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता योगेश्वर पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news