नाशिक : अगोदर पार्किंगची जागा द्या, नंतरच वाहने उचला; टोईंग विरोधात ‘आप’चे आंदोलन

टोईंगविरोधात आंदोलन,www.pudhari.news
टोईंगविरोधात आंदोलन,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

जोपर्यंत नाशिककरांना पार्किंगची व्यवस्था होत नाही. तोपर्यंत वाहतुकीस अडथळा नसलेल्या वाहनांवर टोईंगची कारवाई करु नये या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने शहरात सोमवार (दि. 12) आंदोलन करण्यात आले.

शहरात अनेक महत्वाच्या ठिकाणी पार्किंग नसल्याने नागरिक रस्त्याच्या कडेला वाहने पार्किंग करतात. मात्र, वाहन टोईंग एजन्सी मार्फत कायद्याचा धाक दाखवून ते उचलून नेले जाते. मागील दोन वर्षात कोरोनामुळे सर्वसामान्य नाशिककरांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे. त्यामध्ये टोईंगचा हा भार नाशिकरांना पडवडणार नाही. त्यामुळे वाहन टोईंग एजन्सी मार्फत करण्यात येणारी ही कारवाई थांबवावी. अन्यथा आम आदमी पार्टी  नाशिक तर्फे मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला.

या आंदोलनात आम आदमीचे राज्य नेते जितेंद्र भावे, नाशिक मध्य आणि पश्चिम विधानसभा अध्यक्ष राजेंद्र गायधनी, शहर सचिव जगबीर सिंग, नीलम बोबडे, कस्तुरी आटवणे, रघुनाथ चौधरी, पी. एस. चांदसारे, प्रतीक पवार, समाधान अहिरे, संजय कातकाडे, पंकज निकम, नितीन रेवगडे, योगेश कायस्थ, पद्माकर अहिरे, राजेंद्र हिंगमिरे, कुलजित कौर, पुष्पा ढवळे, प्रमोधिनी चव्हाण, विलास देसले, नितीन भालेराव, सोमा कुर्हाडे, श्रीपाद सोनवणे, जगदीश भापकर, विनोद कळमकर, कलविंदर गरेवाल, बीथाका चौधरी, नेहा बेलेकर, सतीश सांगळे,  संदीप शिरसाट, विकास पाटील, आशिष खंडीजोड, दिनकर पवार, कुसुम अय्यर, चैतन्य सहाने, राजेंद्र खरोटे, सुरज आकोलेकर, अर्जुन सांगळे, अचित जाधव, अदिल शेख, चंदन पवार, डॉ. उज्वल कांगणे, डॉक्टर शरद बोडके, हेमंत राऊत, बाजीराव देवरे, योगेश देशमुख, राज कुमावत, सुमित शर्मा, केशव चौधरी यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news