नाशिक : दगडखाणी परिसरात ईटीएस मोजणी

दगडखाणी www.pudhari.news
दगडखाणी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सारूळ, राजूरबहुला परिसरासह भागडी व संतोषा डोंगर परिसरातील दगडखाणी व स्ट्रोनक्रशर चालकांची चौकशी करावी. तसेच या परिसराची ईटीएसद्वारे मोजणी करावी, असे आदेश अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी जिल्हा गौणखनिज विभागाला दिले आहेत.

मुदत संपलेल्या दगडखाणी, परवानगी नसतानाही होणारे उत्खनन, परवानगीव्यतिरिक्त अन्य ठिकाणी खोदाई, वृक्षांची अवैध तोड आदींमुळे चर्चेत असलेल्या सारूळ, राजूरबहुला परिसराची पाहणी नडे यांनी सोमवारी (दि.23) केली. यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहिणी चव्हाण उपस्थित होत्या. तपासणीवेळी अपर जिल्हाधिकार्‍यांनी दगडखाणीच्या परवानग्या, उत्खनन व अन्य माहिती जाणून घेतली. काही भागांत उत्खननात तफावत आढळल्याची शंका आल्याने परवानग्यांची चौकशी करावी. ईटीएस पद्धतीनुसार खाणींची मोजणी करून उत्खननासाठी परवानगी व प्रत्यक्ष उत्खनन यातील तफावत तपासावी. तसेच त्याचा अहवाल सादर करावा, असेही नडे यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार, तलाठी, मंडल अधिकारी, दगडखाण मालक व स्टोनक्रशर चालक उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त तक्रारींवरून सारूळ व परिसरातील खाणींची तपासणी केली. सविस्तर तपासणी होणे आवश्यक असून, तशा सूचना जिल्हा खनिकर्म अधिकार्‍यांना दिल्या आहेत. भागडी आणि संतोषा डोंगराबाबतही काही आक्षेप आहेत. त्याच्याही तपासणीस सांगितले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत अहवाल अपेक्षित असून, त्यानंतर कारवाई केली जाईल. – दत्तप्रसाद नडे, अपर जिल्हाधिकारी, नाशिक.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news