नाशिक : इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब डिसेंबरमध्ये होणार कार्यान्वित

इलेक्ट्रीक लॅब www.pudhari.news
इलेक्ट्रीक लॅब www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

गेल्या 10 वर्षांपासून रखडलेली इलेक्ट्रीक लॅब याच वर्षी डिसेंबर महिन्यात कार्यान्वित होणार आहे. पहिल्या टप्प्यात एनर्जी मिटर, टेम्परेचर राइज ट्रान्सफॉर्मर आणि टेस्ट फॉर ट्रान्सफॉर्मर या तीन तपासणी सुरु केल्या जाणार आहेत, तर पुढील वर्षी जुलै किंवा ऑगस्टमध्ये दुसऱ्या टप्प्यात शॉटसर्किट, इम्पल्स व्होल्टेज टेस्ट आणि इएमआय इएमसी टेस्ट या तीन तपासणी सुरू होणार असल्याने, जिल्ह्यासह राज्यातील इलेक्ट्रिकल उत्पादकांना याचा मोठा लाभ होणार असल्याची माहिती सेंट्रल पॉवर रीसर्च इन्स्टिट्यूटचे (सीपीआरआय) सहसंचालक एस. श्यामसुंदर यांनी निमा पॉवर प्रदर्शनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

त्र्यंबकरोड येथील आयटीआय काॅलेजच्या मैदानावर आयोजित चार दिवसीय निमा पॉवर प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये इलेक्ट्रीकल-इलेक्ट्रॉनिक क्लस्टरची हमी दिल्यानंतर, गेल्या दहा वर्षांपासून रखडलेली ही लॅब कार्यान्वित होणार असल्याने उद्योग क्षेत्रासाठी मोठा दिलासा ठरणार आहे. नाशिकजवळील शिलापूर येथे शंभर एकर जागेवर या लॅबची इमारत बांधून तयार आहे. नाशिकमधील उद्योगांना त्यांची उत्पादने प्रमाणित करण्यासाठी सीपीआरआयच्या भोपाळ किंवा बंगळुरू येथील टेस्टींग लॅबला पाठवावी लागतात. आता ही लॅब कार्यान्वित होणार असल्याने, उद्योजकांची आर्थिक बचत होण्याबरोबरच वेळही वाचणार आहे. सध्या देशात बेंगळुरू, भोपाळ, हैदराबाद, नोएडा, नागपूर, गुवाहाटी, कोलकाता येथे या लॅब सुरू असून, पुढील सहा महिन्यांत नाशिक व रायपूर येथे त्या सुरू होत आहेत. नाशिकमध्ये ही लॅब सुरू झाल्याने तयार झालेल्या इलेक्ट्रिकल उत्पादनांचे टेस्टिंग लवकर होणार असून जिल्ह्यातील स्मार्ट मीटर उत्पादकांना मोठा लाभ होणार आहे. 'महावितरण'चीही मोठी सोय होणार असल्याचे एस. श्यामसुंदर यांनी सांगितले. यावेळी 'निमा'चे अध्यक्ष धनंजय बेळे, निमा पॉवर प्रदर्शनाचे चेअरमन मिलिंद राजपूत, उपाध्यक्ष आशिष नहार, सरचिटणीस राजेंद्र अहिरे, दिलीप वाघ आदी उपस्थित होते.

निर्यातीला वाव
या लॅबमध्ये चाचणी झालेल्या उत्पादनांना आयएसओ/आयईसी १७०६५ हे प्रमाणपत्र मिळणार असल्याने, उत्पादने निर्यात करण्यातील अडथळा दूर होणार आहे. ही लॅब नाशिकपासून अवघ्या १२ किलोमीटरवर शिलापूर येथे १०० एकर जागेवर उभी राहत आहे. १२ व्या पंचवार्षिक योजनेतून याकरिता ११५ कोटी रुपये मंजूर झालेले असून डिसेंबर २०१८ मध्ये त्याचे भूमिपूजन झाले हाेते. १८ महिन्यात म्हणजे २०२० या वर्षात ही लॅब सुरू होणार हाेती, मात्र आता डिसेंबर २०२३ मध्ये ती कार्यान्वित होणारआहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news