

नाशिक : अंडारोल विक्रेत्यासह टोळक्याने एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना आडगाव शिवारात घडली. हल्लेखोरांमध्ये एका तरुणीचाही समावेश आहे. अजिंक्य लभडे (रा. कोणार्कनगर) जखमी झाला आहे.
अजिंक्य याच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (दि. 30) रात्री तो धात्रक फाट्याजवळ अंडारोल खाण्यासाठी गेला. त्यावेळी अंडारोल विक्रेता गट्ट्या यास अजिंक्यने अंडारोलची ऑर्डर मला उशिरा का देता, असा प्रश्न केला. त्याचा राग आल्याने गट्ट्याने त्याचा मित्र सुशांत नाठे यास बोलावून घेतले. सुशांतसह इतर सात ते आठ संशयितांनी मिळून अजिंक्यस जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात दगड मारला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात टोळक्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.