

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; विषारी खडू खाल्ल्याने १८ महिन्याच्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. शिवम किरण वाघ (१८ महिने, रा. जव्हार) असे या बालकाचे नाव आहे. शिवम याने खेळताना खाली पडलेला विषारी खडू खाल्ला. त्याची तब्येत बिघडल्याने त्यास तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शिवमचा व्हिसेरा राखीव ठेवला असून, त्याचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.