Nashik Crime : महिलेच्या पिशवीतून २ लाख १० हजार रुपयांचे दागिने लंपास

Nashik Crime : महिलेच्या पिशवीतून २ लाख १० हजार रुपयांचे दागिने लंपास

नाशिक : कार्यक्रमास आलेल्या महिलेच्या पिशवीतून चोरट्याने २ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. किरण अभिजित तिडके (रा. तिडके कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार, त्या रुख्मिणी लॉन्स येथे असताना रविवारी (दि. २) मध्यरात्री चोरट्याने पिशवीतून दागिने चोरून नेले. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पादचारी महिलेची चेन ओरबाडली

नाशिक : दिंडोरी रोडवर चायनीज दुकानासमोर पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओरबाडून चोरटे फरार झाले. आशा बापू अथरे (रा. कलानगर) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि. २) सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकीस्वार चोरट्यांनी आशा यांच्या गळ्यातील ४० हजार रुपयांची चेन ओरबाडून नेली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुचितानगरला घरफोडी

नाशिक : सुचितानगर परिसरातील नीलायम अपार्टमेंट येथे चोरट्याने घरफोडी करून ३३ हजार १२५ रुपयांचा ऐवज लंपास केला. उमेश भगवंत पाठक (६३) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने २९ ते ३० जूनदरम्यान घरफोडी करून सोने-चांदीचे दागिने, भांडी व रोकड लंपास केली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाती मृत्यू प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा

नाशिक : गोविंदनगर परिसरात २५ जून रोजी झालेल्या अपघातात मधुकर कारभारी गांगुर्डे (५०, रा. वडाळा नाका) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी तपास करून अज्ञात चारचाकी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारच्या धडकेत दुचाकीस्वार गांगुर्डे ठार झाले होते. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news