गुटखा जप्त,www.pudhari.news
उत्तर महाराष्ट्र
Nashik Crime : अंबडला साडेतीन लाखांचा गुटखा जप्त
नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
अंबड पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस हाकेच्या अंतरावर असलेल्या एका होलसेल गुटखा व्यावसायिकाकडून पोलिसांनी तब्बल साडेतीन लाखांचा गुटखा जप्त करत संशयित सुनील मुसळे याच्यावर गुन्हा दाखल केला.
मंगळवारी रात्री अंबड पोलिसांकडून हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुनील बिडकर यांना एका गोदामात गुटखा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीनुसार अंबड पोलिस ठाण्याच्या पाठीमागे काही अंतरावर मुसळे ट्रेडर्स हा होलसेल गुटखा व्यावसायिक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस पथकाने मुसळे ट्रेडर्सच्या दुकानावर धाड टाकली असता घराच्या बाजूला असलेल्या गोदामात १० पोते पानमसाला तसेच जर्दा गुटखा सापडला.
हेही वाचा :

