सूरज मांढरे यांची बदली ; गंगाथरन डी. नाशिकचे नवे जिल्हाधिकारी

सूरज मांढरे यांची बदली ; गंगाथरन डी. नाशिकचे नवे जिल्हाधिकारी
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून बदलीची चर्चा असलेल्या जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची बदली करण्यात आली असून, नाशिकचे नवे जिल्हाधिकारी म्हणून राज्याच्या मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव असलेल्या गंगाथरन डी. यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यातआली आहे. दरम्यान, मांढरे यांची पुण्याच्या शिक्षण आयुक्तपदी नियुक्ती झाल्याचे कळते.

गंगाथरन डी. नाशिकचे नवे जिल्हाधिकारी
गंगाथरन डी. नाशिकचे नवे जिल्हाधिकारी

राज्यातील नऊ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये डॉ. संजय चहांदे, ए. एम. लिमये, एस. ए. तागडे, आभा शुक्ला, डॉ. अमित सैनी, आर.एस. जगताप, विवेक भीमानवार, राहुल द्विवेदी आणि गंगाथरन देवराजन यांचा समावेश आहे. यामध्ये गंगाथरन देवराजन यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये गंगाथरन वसई-विरार महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक म्हणून वादग्रस्त ठरले होते. येथून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यावेळी त्यांची नाशिकला बदली करण्यात आल्याची जोरदार चर्चाही रंगली होती. मात्र, राज्याच्या मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात आली होती. गंगाथरन देवराजन हे 2013 सालचे आयएएस अधिकारी आहेत. मात्र, बहुतांश ठिकाणी ते वादग्रस्त ठरले असल्याचाही त्यांचा इतिहास आहे.

दरम्यान, 12 मार्च 2019 रोजी सूरज मांढरे यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी पदाचे सूत्रे स्वीकारले होते. सूत्रे स्वीकारताच लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोना विशेषत: मालेगावातील कोरोनाची स्थिती त्यांनी अत्यंत यशस्वीपणे हाताळली. त्यांनी आपल्या कार्यकाळात सेवा आणि कायदा आणला. या अंतर्गत राज्य शासनाच्या 20 सेवा आहेत. त्यांनी त्यामध्ये भर टाकत 101 सेवा आणल्या. कोरोनामुळे दोन्ही पालक गमाविलेल्या जिल्ह्यातील 58 बालकांना 'शासकीय मदत दूत' योजनेतून मदतीचा हात देत त्यांचे पालकत्व त्यांनी स्वीकारले. यासाठी गेल्या मंगळवारीच (दि.8) त्यांना मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कारही प्रदान करण्यात आला.

नाशिकचा अनुभव : 2013 मध्ये आयएएस झाल्यानंतर गंगाथरन डी. यांना प्रोबेशनरी म्हणून कळवण येथे एकात्मिक प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. त्यामुळे त्यांचा नाशिकचा जुना अनुभव असून, जिल्हाधिकारी म्हणून ते छाप पाडतील अशी अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news