नाशिक : शहर पत्रकार संघातर्फे पत्रकारांचा गौरव; ‘पुढारी’चे सतीश डोंगरे यांचा समावेश

दै. ‘पुढारी’चे सतिश डोंगरे.
दै. ‘पुढारी’चे सतिश डोंगरे.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहर पत्रकार संघातर्फे मराठी पत्रकार दिनानिमित्त येत्या शुक्रवारी (ता. 6) सकाळी साडेदहाला गंगापूर रोडवरील 'आयएमआरटी' महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. यावेळी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शहरातील पत्रकारांचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये दै. 'पुढारी'चे सतिश डोंगरे यांचा समावेश आहे.

दरवर्षी दर्पण या पहिल्या मराठी पाक्षिकाचे संस्थापक, संपादक तथा दर्पणकार आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांच्या स्मरणार्थ 6 जानेवारीला माध्यमकर्मी पत्रकार दिन साजरा करतात. यंदाच्या कार्यक्रमात विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते तसेच जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस तसेच नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ड. नितीन ठाकरे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होईल. यावेळी शहरातील विविध दैनिकांचे संपादक उपस्थित राहतील. यंदा होणार्‍या कार्यक्रमात, अझहर शेख (लोकमत), सौरभ बेंडाळे (महाराष्ट्र टाईम्स), संजय चव्हाण (सकाळ), मनीष कटारिया (आपलं महानगर), संकेत शुक्ल (पुण्यनगरी), सचिन जैन (दिव्य मराठी), वैशाली शहाणे (देशदूत), चारुशीला कुलकर्णी (लोकसत्ता) यांचा स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरव होणार आहे. पत्रकार दिन कार्यक्रमात शहरातील सह्याद्री सुपर स्पेशालिटी रुग्णालयातर्फे पत्रकारांसाठी वैद्यकीय उपचार, तपासण्या व सहाय्य यासाठी उपयुक्त असलेले प्रिव्हिलेज कार्ड वितरित केले जाईल. या कार्डचा लाभ पत्रकार आणि त्यांची पत्नी, दोन मुले तसेच आई आणि वडील यांना होईल. पत्रकार दिनाच्या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शहर पत्रकार संघाचे प्रभारी अध्यक्ष संपत देवगिरे आणि कार्यकारी समितीतर्फे करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news