नाशिक : ज्येष्ठांसाठी शहरात विरंगुळा केंद्र तयार करावे – जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते

नाशिक : महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते.
नाशिक : महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते.
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अंदाजपत्रकात दलित वस्ती सुधार योजनेसह महिला बालकल्याण आणि क्रीडा यासाठी निधी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र अंदाजपत्रकातील ही तरतूद अन्यत्र विभागांकडे वळविली जाते. त्यामुळे यापुढील काळात तसे होऊ नये यासाठी लक्ष घालावे, अशी सूचना करत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी शहरात ठिकठिकाणी ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र तयार करण्याची मागणी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली आहे.

राज्य शासनाच्या अंदाजपत्रक नियमानुसार 20 टक्के राखीव निधी ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार दलित वस्त्यांचा विकास, महिला बालकल्याण, विविध प्रशिक्षण या घटकांसाठी प्रत्येकी पाच टक्के निधी राखीव ठेवला जातो. परंतु, गेली अनेक वर्षे या निधीची पळवापळवी केली जात असल्याने संबंधित चारही घटक दुर्लक्षित राहात असल्याची बाबही बोरस्ते यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. नाशिक शहरात 159 वस्त्या असून, या वस्त्यांमधील ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे निर्माण झाली पाहिजेत. विरंगुळा केंद्रात तसेच शहरातील विविध जॉगिंग ट्रॅकच्या ठिकाणी केवळ ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आकर्षक बेंचेस बसवली पाहिजेत. लहान मुलांसाठी चांगली खेळणी, व्यायामशाळा असतील तर व्यायाम साहित्य किंवा ग्रीन जिम असाव्यात. त्याचप्रमाणे चांगली सुलभ शौचालय आणि केवळ महिलांसाठी काही शौचालय हे राखीव असावे, अशी सूचनाही त्यांनी केली. शहरामध्ये 346 अंगणवाड्या आहेत. दुर्देवाने अंगणवाड्याची दुर्दशा झाली आहे. अनेक अंगणवाड्यांना स्वतःची इमारतच नाही. अंगणात, झाडाखाली या अंगणवाडी भरतात. अंदाजपत्रकात इमारतींसाठी तरतूद धरावी. उद्यानांची देखभाल करतांना मनपाला तारेवरची कसरत करावी लागते. म्हणून प्रत्येक विभागात क्रीडांगणे निर्माण झाली पाहिजेत. लहान मुलांपासून ते तरुण पिढी ही मोबाइलच्या आणि सोशल मीडियाची व्यसनाधिन झाली आहे. म्हणून सुदृढ नाशिककर घडवायचा असेल, तर क्रीडांगणांची आवश्यकता असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने राखीव ठेवलेला 20 टक्के निधी त्या – त्या राखीव क्षेत्राकरताच वापरण्यासाठी काही कालमर्यादा निश्चित केली पाहिजे. त्यानुसारच तो निधी संबंधित विभागासाठी खर्च होण्याकरिता रकमांचा अंदाजपत्रकात समावेश करावा, अशी मागणीही बोरस्ते यांनी केली.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news