नाशिक : मनोरुग्णाने स्वत:च्या घराला लावली आग

नाशिक : मनोरुग्णाने स्वत:च्या घराला लावली आग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कॉलेजरोडलगत असलेल्या पाटील लेन परिसरात एका मनोरुग्णाने त्याच्या घरात आग लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यात घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग विझवत घरातील गॅस सिलींडर बाहेर काढल्याने अनर्थ टळला. याआधी देखील या व्यक्तीने असे प्रकार केल्याचे समजते.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, पाटील लेन चारमधील शारदा संकुल येथील एका सदनिकेत व्यक्ती राहत असून ती मनोरुग्ण आहे. या व्यक्तीने सकाळी अकरा ते साडे अकराच्या सुमारास त्याच्या घरास आग लावून तेथून निघून गेला. घरातून धुर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर विशाल करंजकर यांनी याची माहिती अग्निशमन दलास कळवली. पंचवटी विभागातील दोन बंब तातडीने घटनास्थळी गेले. आग पसरल्याने घरातील टीव्ही, फर्निचर, कपडे आदी जळून खाक झाले. घरात दोन सिलींडर होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन्ही सिलींडर शोधून ते घराबाहेर आणून सुरक्षीत स्थळी ठेवल्याने अनर्थ टळला. या व्यक्तीविराेधात परिसरातील नागरिकांनी याआधी पोलिसांकडे तक्रारी केल्याचे समजते. त्याने दोन वेळा असाच प्रकार केल्याची चर्चा परिसरात होती.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news