Navapur Bus Stand Accident | नवापूर स्थानकात बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू

संतप्त प्रवासी आणि कार्यकर्त्यांचा नवापूर आगारात घुसून गोंधळ
Accident News
Accident NewsPudhari
Published on
Updated on

Woman Killed in Bus Accident

नंदुरबार : बस स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या महिलेला आणि मुलीला मागे येणाऱ्या बसची जबर धडक बसली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. नवापूर बस स्थानकात शनिवारी (दि. 11) हा अपघात घडला. याप्रसंगी संतप्त प्रवासी आणि कार्यकर्त्यांनी नवापूर आगारात घुसून एकच गोंधळ घातला.

प्रवाशांनी आणि ग्रामस्थांनी बस आगाराच्या भोंगळ कारभारा बद्दल संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. अधिक वृत्त असे की, आज शहादा आगाराची शहादा-सुरत ही बस नवापूर येथे पोहोचली. त्यानंतर नवापूर बस स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर उभी करण्यासाठी बस मागे घेण्यात येत असताना प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या कोमूबाई कोठाऱ्या गावित (वय 50) या महिलेला आणि तिच्यासोबतची नात नीतीक्षा गावित (वय 15) या दोघांना जबर धडक बसली.

Accident News
Nandurbar Fraud : नंदुरबारमध्ये खळबळ! जिल्हा रुग्णालयात नोकरीच्या आमिषाने 17 जणांची फसवणूक; रॅकेटचा पर्दाफाश

त्यात कोमूबाई गंभीर जखमी झाल्या. धडक बसताच परिसरात एकच खळबळ उडाली. प्रवासी, ग्रामस्थ, विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते घटनास्थळी धावून आले. आगार व्यवस्थापकासह कर्मचारी देखील धावून आले. दोन्ही जखमींना तातडीने नवापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि वैद्यकीय अधिकारी यांनी जखमी महिला कोमूबाई यांना मृत घोषित केले. त्याप्रसंगी नातलगांचा आक्रोश उपस्थितांचे हृदय हेलावून गेला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील उपस्थित झाले आणि त्यांनी संतप्त समूहाला नियंत्रित केले. संबंधित बसचे चालक आणि वाहक दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news