Nandurbar Fraud : नंदुरबारमध्ये खळबळ! जिल्हा रुग्णालयात नोकरीच्या आमिषाने 17 जणांची फसवणूक; रॅकेटचा पर्दाफाश

Nandurbar Crime : एका तरुणाने दिलेल्या फिर्यादी नंतर या भ्रष्टाचाराला तोंड फुटले असून जिल्हा रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Fraud
FraudPudhari
Published on
Updated on

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली अनेक बेरोजगारांकडून रक्कम उकळणे गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. एका तरुणाने दिलेल्या फिर्यादी नंतर या भ्रष्टाचाराला तोंड फुटले असून जिल्हा रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून 17 जणांची फसवणूक केल्याविषयीचा दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात आणि वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी स्वरूपात नेमणुका करणे चालू आहे. तथापि नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय येथील अधिकाऱ्यांमध्ये उठबस असलेल्या काही जणांनी साखळी निर्माण केली असून नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने येणाऱ्या बेरोजगारांची लूट चालू केली असल्याची जाहीर चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू आहे. 30 आणि 40 हजार रुपयात या नेमणुका मिळवून देणे चालू असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या वर्तुळात बोलले जात होते. परंतु नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या एका गुन्ह्यामुळे या प्रकाराला वाचा फुटली आहे. जिल्हा रुग्णालयासमोरच्या हॉटेलातील दोन जणांनी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामुळे या भ्रष्टाचारात मोठी साखळी गुंतल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

17 जणांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल

दरम्यान, नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याची फिर्याद सुरज भरत गावीत (वय २२ वर्षे) रा. घोगळपाडा ता. नवापुर जि. नंदुरबार या तरुणाने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. त्या फिर्यादीत म्हटले आहे की, कृष्णा चिंतामण गावीत आणि मनोज जालमसिंग गावित दोन्ही रा. टोकरतलाव ता.जि. नंदुरबार या दोघांनी, आम्ही तुम्हाला नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात सफाई कामगार म्हणून लावून देतो, त्याच्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील, असे सांगितले आणि सुरज कडील कागदपत्र ताब्यात ठेवून घेतले. नंतर मोबाईल द्वारे फोन करुन वेळोवेळी पैसे मागितले. तेव्हा फिर्याद देणारा सूरज याने दिनांक 9 डिसेंबर 25 रजी

17 हजार रुपये कृष्णा गावित याला जिल्हा रुग्णालयासमोरील हॉटेलवर जाऊन दिले. त्यानंतर दुस-या दिवशी दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी फिर्यादीने पत्नीचे रोख 17000 रुपये सकाळी ०८.३० वाजेला स्वतः हॉटेलवर जावून दिले. 8 जानेवारी 2026 रोजी तुमची ऑर्डर नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात मिळून जाईल, असे त्यानंतर सांगितले. परंतु प्रत्यक्षात तसे घडले नाही. म्हणून सुरज आणि त्याची पत्नी 20 जानेवारी 2026 रोजी सरकारी दवाखान्यात ऑर्डर घेण्यासाठी आले असता तेथे इतर 17 जणांची देखील याप्रमाणे फसवणूक झाली असून तीन लाख 16 हजार रुपये त्यांच्याकडून लाटण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सुरज गावित यांनी फिर्यादीत तसे म्हटले आहे. त्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला असून शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तानाजी बहिरम अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news