धक्कादायक! बांबूच्या झोळीतून नेल्या जाणाऱ्या महिलेची रस्त्यातच प्रसुती

रस्त्याअभावी गर्भवतीची बांबूच्या झोळीतून वाहतूक, डोंगरातच प्रसूती
Pregnant Woman delivery
बांबूच्या झोळीतून नेत असताना गर्भवतीची डोंगरातच प्रसूती झालीPudhari File Photo

नंदुरबार : एका गर्भवती महिलेला रस्त्या अभावी डोंगरदरीतून पायपीट करीत बांबूच्या झोळीतून वाहून नेत असताना भर रस्त्यात ओसाड डोंगरावर त्या महिलेची प्रसूती झाली. ही धक्कादायक घटना धडगाव तालुक्यातील तेलखेडी या अति दुर्गम गावात उघडकीस आली. या घटनेवरून स्थानिक आमदार आणि खासदार आता टीकेचे लक्ष बनले आहेत.

आदिवासी दुर्गम भाग म्हटला की, रस्त्या अभावी डोंगरदरीतून पायपीट करत बांबूच्या झोळीतून रुग्णांची ने-आण करण्याचे दृश्य दिसणार, हे जणू ठरलेलेच आहे. अब्जावधी रुपयांच्या योजना खर्ची पडून सुद्धा अजूनही अनेक गाव पाडे असे आहेत ज्यांचा पावसाळा सुरू होताच संपर्क खंडीत होतो.

धडगाव तालुक्यातील तेलखेडी या अति दुर्गम गावातील खुंटी पाड्यातील अर्चना पावरा ही महिला प्रसुती काळ जवळ आल्याने नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत होती. तथापि तिला त्रास सुरू झाला. त्यादरम्यान पावसामुळे संपर्क तुटला होता. तसेच कोणताही रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांनी बांबूची झोळी करून खांद्यावर पायपीट करीत अनेक किलोमीटर तिला वाहून आणले. परंतु त्या महिलेचा त्रास वाढला आणि डोंगरदरीच्या मार्गातच तिची प्रसूती पार पडली. संस्थात्मक प्रसूती संख्या वाढवून या प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणा करीत असते, तरीही अनेक गाव, पाडे असे आहेत. जिथे रस्ते नसल्यामुळे ॲम्बुलन्स पोहोचत नाहीत.त्यामुळे तेथील नागरिकांना अशा समस्येला सामोरे जावे लागते.

सतत निवडून येण्याचा विक्रम करणारे आमदार आणि नवनिर्वाचित खासदार याच धडगाव तालुक्यातील आहेत. मग त्यांनी या स्थितीची दखल का घेतलेली नाही? यात बदल का घडवलेला नाही, असे प्रश्न करणारी टीका सोशल मीडियातून सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news