

नंदूरबार | पुढारी ऑनलाइन डेस्क् | सध्या सर्वत्र भीषण पाणीटंचाई भेडसावत असून ठिकठिकाणी पाण्याचे टँकरला मागणी वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रात पाणीटंचाई कायमची झाली असून यासाठी प्रत्येकाने आपल्या स्वत:पासून पाणीबचतीचा मंत्र जोपासला पाहिजे. यासाठी नंदूरबार येथे एका पेट्रोलपंपावर पाणी बचतीकरीता नंदूरबार जलसंपदा विभागाकडून भविष्यात पेट्रोलप्रमाणे पाण्याचे पंप करावे लागू नयेत... जल है तो कल है... असा संदेश देण्यात आहे.
पाण्याचा अपव्यय टाळा... पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरा असा संदेश देणारा बॅनर पेट्रोलपंपाच्या प्रवेशद्वारावरच लावण्यात आला असून अशाप्रकारे 100 ठिकाणी लावण्यात आलेल्या या बॅनरची चर्चा होत आहे. नंदूरबार जिल्हा प्रशासनाकडून दुर्गम भागात टँकर पोहोचवले जात असून पाणीबचतीसाठी मूलमंत्र दिला जात आहे.