Unseasonal Rain Nandurbar | नंदुरबारला पुन्हा गारपीट-वादळी पावसाचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान

तालुक्यातील पूर्व भागासह शहराला वादळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले
  unseasonal rain
unseasonal rain Pudhari
Published on
Updated on

Hailstorm in Nandurbar

नंदुरबार : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असतानाच गुरूवारी (दि. २) पुन्हा एकदा नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागासह शहराला वादळी पाऊस आणि गारपीटीने अक्षरशः झोडपून काढले. काही ठिकाणी झाडे व विद्युत खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार ३० व ३१ मार्च रोजी तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली होती. या तडाख्यात कांदा, गहू, हरभरा आणि टरबूज पिकांचे मोठे नुकसान झाले. गारपीट व वादळी वाऱ्यामुळे उभे असलेले गहू तसेच काढणी करून ठेवलेला हरभरा व गहू खराब झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

  unseasonal rain
Nandurbar crime news: वाहन अडवून वसुली करणाऱ्या तीन तोतया पोलीसांना पकडले; नवापूर पोलिसांची कारवाई

दरम्यान, नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा सुरू असतानाच गुरुवारी दुपारी तीननंतर पुन्हा वादळी पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि प्रचंड धुळीच्या वाऱ्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सायंकाळी पाचनंतरही पुन्हा पावसाने जोर धरला.

नंदुरबार शहरात चक्रीवादळासारखा वारा सुटल्याने धूळमातीचे लोट उसळले. काही ठिकाणी गारपीटही झाली. अनेक घरांचे पत्रे उडाले, तर रस्त्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्या. सुमारे पाऊण तास सुरू असलेल्या या पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले.

  unseasonal rain
Nandurbar News : नंदुरबारमध्ये मृत्यूचा फास! उड्डाणपुलावर मांजाने दुचाकीस्वाराचा गळा चिरला; सुदैवाने बचावले प्राण

वादळी पावसामुळे काही ठिकाणी वीजतारा व खांब तुटल्याने दुपारी तीन वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला होता. बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात नागरिकांची एकच धावपळ उडाली.

चौपाळे, वावद, शनिमांडळ, रनाळे आदी भागांतील पिकांनाही या पावसाचा फटका बसल्याची माहिती मिळत आहे. तहसीलदार प्रदीप पवार व आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाशी संपर्क साधला असता, अद्याप जीवितहानीची माहिती नसून मोठ्या नुकसानीबाबतही अधिकृत अहवाल प्राप्त झालेला नसल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news