Headmaster Caught Taking Bribe | 70 वर्षीय कामाठी वृद्धाकडून लाच स्वीकारताना शिक्षकासह मुख्याध्यापकाला अटक

नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून केली कारवाई
Bribery case
Headmaster Caught Taking BribePudhari File Photo
Published on
Updated on

नंदुरबार : आश्रम शाळेतील 70 वर्षीय सेवानिवृत्त कामाठी वृद्धाकडून लाच स्वीकारताना शिक्षकाला रंगेहात पकडण्यात आले. या शिक्षकासह मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून आज दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी ही कारवाई केली.

अधिक वृत्त असे की, शासकीय आश्रमशाळा, जांभयी, ता. तळोदा येथून सन 2014 मध्ये कामाठी या पदावरून सेवानिवृत्त झालेले एक सत्तर वर्षीय वृद्ध कर्मचारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन 2006 ते 2014 पर्यंतचे प्रोत्साहन भत्त्याचे देयक रु.54956/- प्रलंबित होते. सदर देयक तयार करून दिल्याच्या मोबदल्यात प्राथमिक शिक्षक, वर्ग 3 भागवत नारायण जगताप हे बक्षिस म्हणून 1500 रु लाचेची मागणी करीत असल्याबाबत दिनांक 26/08/2025 रोजी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली होती.

Bribery case
Nandurbar Crime : नंदुरबार हादरले! बॅनर लावण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

त्या तक्रारीवरून दिनांक 26/08/2025 रोजी शासकीय आश्रमशाळा, जांभयी ( बोरद) येथे पडताळणी दरम्यान शिक्षक भागवत नारायण जगताप यांनी तक्रारदार यांचे प्रोत्साहन भत्त्याचे देयक तयार करून दिल्याच्या मोबदल्यात बक्षिस म्हणून 1500 रु ची लाचेची मागणी केली. त्याचवेळी मुख्याध्यापक अनील देवराम झाल्टे यांनी सदर लाच रक्कम स्विकरण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज दिनांक 28/08/2025 रोजी चिनोदा फाटा, तळोदा येथे मागणी केलेली 1500 /-रु लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

Bribery case
Nandurbar Housing Scheme | नंदुरबार शहरातील घरकुलांच्या जागेचा प्रश्न सुटला; 500 बेघर आदिवासींना होणार लाभ

लाच घेणाऱ्या शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचेविरुद्ध तळोदा पोलीस स्टेशन येथे भ्र प्र अधिनियम, 1988 चे कलम 7, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पर्यवेक्षण अधिकारी प्रशांत भरते, पोलीस उप अधीक्षक, सापळा व तपास अधिकारी पो.नि.पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पो नि विकास लोंढे, ASI विलास पाटील, HC विजय ठाकरे, HC देवराम गावीत HC हेमंकुमार महाले यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news