Suzlon Company Fraud | सुझलॉन कंपनीची 28 लाखांची फसवणूक; माजी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील केबल चोरीच्या काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला
Online Fraud
Online Fraudpudhari photo
Published on
Updated on

Nandurbar Suzlon Company Fraud

नंदुरबार : सुझलॉन टॉवरमधील केबल चोरीच्या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या सुमारे 28 लाख रुपयांच्या कॉपर केबल आणि इतर मुद्देमालाची परस्पर विक्री करून कंपनीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या वतीने नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुझलॉन कंपनीचे महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यांचे सुरक्षा प्रमुख अमित राजबहादूर यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तुकाराम झावरे (रा. सुझलॉन गेस्ट हाऊस, नंदुरबार; मूळ रा. मधुबन कॉलनी, जुने सांगवी, पुणे) हे कंपनीच्या वतीने कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील केबल चोरीच्या काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला होता.

Online Fraud
Illegal Liquor Nandurbar | बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त; १० लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त, एक जण ताब्यात

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, सन 2022 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत झावरे यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कंपनीचे बनावट अधिकारपत्र तयार केले. त्याच्या आधारे चोरीच्या गुन्ह्यांमध्ये जप्त झालेला कॉपर केबलसह इतर मुद्देमाल सुझलॉन कंपनीच्या ताब्यात न देता स्वतःकडे ठेवून त्याची बेकायदेशीर विक्री केली.

या प्रकारामुळे कंपनीचे सुमारे 28 लाख 41 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंतर्गत पडताळणीदरम्यान हा प्रकार उघड झाल्यानंतर कंपनीच्या वतीने सुरक्षा प्रमुख अमित यादव यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

Online Fraud
Nandurbar Kapas Kranti | नंदुरबार जिल्ह्यात 'कपास क्रांती' अंतर्गत 643 कोटींचा निधी मंजूर

तक्रारीच्या आधारे नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात संबंधिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news