Ganja cultivation nandurbar : नंदुरबारचा दुर्गम भागही गांजा लागवडीने व्यापला; सुमारे 1 कोटी किमतीची झाडे डोंगराळ शेतातून केली जप्त

गांजा विरोधात आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे
Ganja
GanjaPudhari
Published on
Updated on

नंदुरबार : पोलिसांनी छापेमारी करून दुर्गम डोंगराळ शेतातून सुमारे 1 कोटी 5 लाख 17 हजार रुपयांची झाडे जप्त केली. धडगाव तालुक्यातील गेंदा शिवारात ही कारवाई करण्यात आली असून यामुळे दुर्गम डोंगराळ भागात गांजा लागवडीचा जोरदार कारभार चालतो, हे उघड झाले. गांजा विरोधात आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

Ganja
Nandurbar Crime : एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; दोरीच्या शास्त्रशुद्ध गाठीने वाढवले मृत्यूचे गुढ!

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील गेंदा गावाच्या शिवारात एका इसमाने वनपट्ट्याच्या शेतात गांजाच्या झाडाची लागवड केली असल्याची माहिती धडगावचे पोलिस निरीक्षक सुनिल भाबड यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने गेंदाचा उंबरपाडा शिवारातील शेतात जावून छापा टाकला असता गेंदाचा उंबरपाडा येथील आलशा मालसिंग पावरा (वय ४०) हा शेतात गांजाच्या झाडांची लागवड करतांना रंगेहाथ मिळून आला. यावेळी पोलिसांच्या पथकाने शेतातून मुळासकट ३ ते ५ फुट उंचीची २१० किलो ३०० ग्रॅम वजनाची पांढऱ्या कापडात बांधलेली १४ झाडे जप्त केली. त्याची किंमत सुमारे 1 कोटी 5 लाख 17 हजार रुपये असून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Ganja
Nandurbar Crime | नंदुरबार: घराची तोडफोड आणि वाहनाची जाळपोळ; पोलिसांच्या कारवाईमुळे स्थिती नियंत्रणात

याबाबत पोकॉ. जलसिंग वाडग्या वसावे यांनी धडगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित शेतमालक आलशा मालसिंग पावरा याच्या विरोधात १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (आय आय) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करुन संशयीताला अटक करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळ, शहाद्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धडगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल भाबड, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, हेकॉ. शिवलाल पावरा, हेकॉ. सुभाष तमखाने, पोकॉ. विश्वजीत चव्हाण, पोकॉ. मनिष पावरा, पोकॉ. अशोक पाडवी, पोकॉ. किरण भिल, पोकॉ. दिपक मालचे, पोकॉ. जलसिंग वसावे, पोकॉ. किरण पाडवी, पोकॉ. मानसिंग वळवी, पोकॉ. प्रशांत यादव, चापोना. सुनिलकुमार सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news