Nandurbar News | सिमी संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Nandurbar News | सिमी संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार – बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम 1967 (सुधारणा 2004) अन्वये स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतीची अधिसूचना 29 जानेवारी 2024 रोजी केंद्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली असून पुढील 5 वर्षांसाठी ही बंदी असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

याविषयी राज्य शासनाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रान्वये कळविण्यात आले असून या कायद्याच्‍या तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जारी केलेल्या दुसऱ्या आदेशात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यात कुठेही जात, भाषा, धर्म या आधारावर राजकीय शिबीरे, मेळावे आयोजनावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (6 जून 2024 पर्यंत) निर्बंध घालण्यात आले आहेत़.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम 16 मार्च 2024 पासून घोषित केला असून या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यात जात, भाषा, धार्मिक शिबीरे, मेळावे आयोजनावर निर्बंध घालणे आवश्यक असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news