Nandurbar Worker Death | जनरेटर अंगावर कोसळून मजुराचा मृत्यू; मृतदेह मालकाच्या घराबाहेर ठेवून नातेवाईकांचा ठिय्या

नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील घटना, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मृतदेह ताब्यात
Navapur Worker Death
रतन कसबेPudhari
Published on
Updated on

Navapur Worker Death

नंदुरबार : मंडप उभारणीच्या कामासाठी वापरण्यात येणारे अवजड जनरेटर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविताना ताबा सुटून अंगावर कोसळल्याने २७ वर्षीय तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे रात्री घडली.

या घटनेनंतर संतप्त नातेवाईक व समाजबांधवांनी मृतदेह जनरेटर मालकाच्या घराबाहेर ठेवून ठिय्या आंदोलन केले. संबंधितावर कारवाई करून न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिस व ग्रामस्थांच्या मध्यस्थीनंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

Navapur Worker Death
Nandurbar Ganja Seized | सलग तिसऱ्यांदा छापेमारी; शेतातून ९३ लाखांचा १८६ किलो गांजा जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, खांडबारा येथील रतन अशोक कसबे (वय २७) हा मुनाफ पिंजारी यांच्याकडे मंडप उभारणीचे मजुरीचे काम करीत होता. रात्री कामाच्या ठिकाणी ठेवलेले अवजड जनरेटर दुसऱ्या ठिकाणी हलविण्याचा प्रयत्न सुरू असताना त्याचा ताबा सुटला. त्यावेळी जनरेटर थेट रतन कसबे यांच्या अंगावर कोसळले. त्यामुळे ते जनरेटरखाली दबले गेले.

घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जनरेटर उचलून रतन यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.

Navapur Worker Death
Nandurbar News : मक्याच्या पिकात गांजाची शेती; २ कोटी २१ लाखांचा गांजा जप्त!

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रतन यांच्या नातेवाईकांसह समाजबांधव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह जनरेटर मालक मुनाफ पिंजारी यांच्या घराबाहेर आणून ठेवला. संबंधित मालकावर कारवाई करावी आणि कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी करीत नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. न्याय मिळेपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रतन कसबे हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पत्नी गर्भवती आहेत. मात्र, त्यापूर्वीच रतन यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाचा प्रमुख आधार हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस व ग्रामस्थांच्या मध्यस्थीनंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news