Nandurbar News : मक्याच्या पिकात गांजाची शेती; २ कोटी २१ लाखांचा गांजा जप्त!

एकाला अटक तर दुसऱ्या संशयिताचा शोध सुरु
Ganja Seized
गांजाची शेती(File Photo)
Published on
Updated on

नंदुरबार : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धडगाव तालुक्यातील घाटली गावाच्या शेतशिवारात छापा टाकत तब्बल २ कोटी २१ लाख ५८ हजार रुपये किमतीचा ४४३ किलो गांजा जप्त केला.

नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागात लागोपाठ दुसऱ्या दिवशी ही मोठी कारवाई करण्यात आल्याने अवैध अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दोन दिवसांपूर्वीच नर्मदा काठच्या एका शेतातून १ कोटी रुपयांची गांजाची झाडे जप्त करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तात्काळ पथक तयार करून घाटली शिवारात कारवाईचे आदेश दिले. पथकाने वनजमिनीतील मका व तुरीच्या आंतरपिकाची पाहणी केली असता, त्यात गांजाच्या झाडांची बेकायदेशीर लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ४४३ किलो वजनाची गांजाची झाडे ताब्यात घेतली. या प्रकरणी संशयित आरोपी शैलेश शंकर पावरा (रा. घाटली, ता. धडगाव) यास ताब्यात घेण्यात आले असून, एका फरार आरोपीविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, महेश निकम, पोलीस हवालदार दिनेश चित्ते, स्वप्नील गोसावी, मुकेश तावडे आणि पोलीस अंमलदार मनोज महाजन, अभय राजपूत, निशीगंध गवळे, हेमंत बारी, विनोद पाटील, कल्पेश मोरे, राहुल पांढारकर यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news