Nandurbar Lok Sabha Election : महायुतीच्या डॉ. हिना गावित यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Nandurbar Lok Sabha Election : महायुतीच्या डॉ. हिना गावित यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Published on
Updated on

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा : महायुती मधील सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत डॉ. हिना गावित यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून आज सोमवार (दि. 22) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा घडवल्या जात असतानाच आज प्रत्यक्ष रॅली प्रसंगी मात्र खासदार डॉक्टर हिना गावित यांच्यासाठी सर्वपक्षीय नेते आवर्जून उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले. (Nandurbar Lok Sabha Election)

यावेळी, काढण्यात आलेल्या रॅलीत आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी, आमदार काशीराम पावरा, ज्येष्ठ नेते भूपेश भाई पटेल, आमदार राजेश पाडवी, शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित, विधान परिषद सदस्य आमशा पाडवी, माजी आमदार पद्माकर वळवी, माजी आमदार शिरीष चौधरी, लोकसभा प्रभारी तुषार रंधे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, महिला मोर्चा अध्यक्ष सविता जयस्वाल, डॉक्टर विक्रांत मोरे व अन्य मान्यवर रॅलीच्या अग्रभागी होते.  Nandurbar Lok Sabha Election

ज्येष्ठ नेते डॉक्टर कांतीलाल टाटिया, डॉक्टर शशिकांत वाणी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत दादा गावित, ज्येष्ठ नेते शिवाजीराव दहिते, राष्ट्रवादीचे सुरेशराव सोनवणे, चंद्रजीत भैय्या पाटील व अन्य मान्यवरांसह महायुती मधील सर्व मित्र पक्षांचे नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर, शहादा, शिरपूर आणि साक्री या आठही तालुक्यातील प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

हेही वाचा –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news