Nandurbar solar project fraud|स्वखर्चाने सोलर प्रोजेक्ट उभारून देण्याची थाप, 71 लाख रुपये लुबाडले; वयोवृद्धाची फसवणूक

Nandurbar solar project fraud| स्वखर्चाने सोलर प्रोजेक्ट उभारून देण्याची थाप मारत 71 लाख रुपये लुबाडले; नंदुरबारमध्ये वयोवृद्धाची फसवणूक
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

नंदुरबार - मध्यप्रदेशातील एका कंपनीच्या नावे काम करणाऱ्या दोन जणांनी स्वखर्चाने सोलर प्रोजेक्ट उभारून देतो, अशी थाप मारून अनामत रकमेच्या नावाखाली तब्बल 71 लाख रुपये लुबाडले. एका वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांने याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नंदुरबार येथील सेवानिवृत्त कर्मचारी चतुर सहादु पाटील (वय ७० वर्षे, रा. ज्ञानदिप सोसायटी, धुळे रोड, हॉटेल हिरा एक्झिक्युटीव्ह समोर, नंदुरबार) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, व्हर्च्यओसो ट्रेड अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड मार्फत चालवित असलेल्या सोलर प्रोजेक्टबाबत माहिती देण्यासाठी दीपक वर्मा आणि चोलेश्वर कमलरत्ने हे दोन जण त्यांना त्यांच्या ज्ञानदीप सोसायटीतील घरी येऊन भेटले. आम्ही शेतामध्ये स्वखर्चाने सोलर प्रोजेक्ट उभारून देतो, त्यासाठी तुमच्या शेतातील जागा उपलब्ध करून द्यावी; असे सांगितले.

दरमहा एक मेगा व्हॅटला कर्जाची परतफेड होईपर्यंत २ लाख रुपये दरमहा मिळतील व कर्जाची परतफेड झाल्यानंतर दरमहा ९ लाख रुपये रक्कम मिळेल, असे आश्वासन दिले. परंतु एका मेगा व्हॅटला ५ लाख रुपये व दोन मेगा व्हॅटला ८ लाख रुपये अनामत रक्कम भरावी लागेल असे सांगितले.

विशेष असे की, दीपक वर्मा आणि कमलरत्ने यांनी चक्क सदर प्रोजेक्ट पुर्ण केले नाहीतर तीनपट रक्कम परत करू; अशी हमी देणारी नोटरी करून दिली. त्यानुसार चतुर पाटील आणि अन्य शेतकरी यांनी विश्वास ठेवून अनामत रकमा त्यांच्या कडे जमा केल्या. असे एकूण 71 लाख रुपये इतकी अनामत रक्कम भरण्यात आली, असे फिर्यादीत म्हटले आहे. परंतु वास्तवात अद्यापपर्यंत त्याच्या शेतामध्ये सोलर प्रोजेक्ट उभे करून दिलेले नाही.

रक्कम परत मागितली असता दीपक वर्मा याने त्यांच्या नावे आयसीआयसीआय बँकेमध्ये ५ कोटी रक्कमेची फिक्स डिपॉझिटची एफ.डी. केली असल्याची बनावट पावती दाखवली आणि 19 जानेवारी 2026 रोजी हे डिपॉझिट मॅच्युअर्ड होईल तेव्हा तुमची रक्कम परत करतो, अशी थाप मारली. दिनांक 1 ऑक्टोबर 2020 ते 19 जानेवारी 2026 दरम्यान हा सर्व फसवणुकीचा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Crime News
Nandurbar News : 'हाच आहे का मोदीजींचा नवा भारत?' ; नंदुरबारच्या दुर्गम भागातील पाहणीवेळी अभिजित दीपकेंचा सवाल

यावरून दिपक ठाकोरोद्दीन वर्मा (रा. काशिनगर, नोनिया कर्बल, छिंदवाडा, मध्य प्रदेश) हल्ली मुक्काम विश्वकर्मा नगर, भोपाळ (मध्य प्रदेश) आणि चोलेश्वर कमलरत्ने (रा. जुना टॉवर डी आरएमझेड मद्रास रोड, बंगळूर) या दोघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भान्सी हे अधिक तपास करीत आहेत.

Crime News
Nandurbar Crime : अक्कलकुवा नवोदयमधील विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापकासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news