Nandurbar Crime : अक्कलकुवा नवोदयमधील विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापकासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

विद्यार्थिनीच्या वडिलांकडून मृत्यूचे प्रकरण संशयास्पद असल्याची तक्रार
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

नंदुरबार - अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वस्तीगृहात अचानक मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीच्या वडिलांनी मृत्यूचे प्रकरण संशयास्पद असल्याची तक्रार दिली. यामुळे जवाहर नवोदयचे मुख्याध्यापक, वॉर्डन आणि स्टाफ नर्स यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

15 वर्षीय विद्यार्थिनी निहारीका अनिल कोळी रा. धडगाव ही अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयातील वस्तीगृहात राहून शिक्षण घेत होती. दरम्यान, काल दिनांक 23 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी साडेसहा वाजता ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तातडीने तिला उपचारासाठी स्थानिक उप रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी ती मृत झाल्याचे घोषित केले होते. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. तिच्या आई-वडिलांनाही प्रचंड धक्का बसला.

वस्तीगृहातील विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अर्जुन पटले यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. त्यानंतर विच्छेदनासाठी विद्यार्थिनीचे शव नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते.

दरम्यान , काल दिनांक 23 सप्टेंबर 2026 रोजी रात्री आठ वाजे नंतर मयत विद्यार्थिनीचे वडील अनिल श्यामराव कोळी यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. मयत विद्यार्थिनी निहारिका हिच्या सुरक्षिततेबाबत व आरोग्याबाबत देखरेख न करता निष्काळजीपणा केल्यामुळे आपली मुलगी निहारिका मरण पावली असून तिच्या मृत्यू बाबत संशय असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

त्यावरून विद्यार्थिनीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली विलास मच्छिंद्र पाटील, (मुख्याध्यापक), प्रियंका वसावे (वॉर्डन) आणि शेट्टी (स्टॉफ नर्स) भानुप्रिया व इतर सबंधीत तिन्ही शासकीय रा.जवाहर नवोदय विद्यालय अक्कलकुवा यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पो. ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक अर्जुन पटले हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news