

नंदुरबार : शहरात काही गुन्हेगारी टोळ्यांच्या हालचाली वाढू लागल्याने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन टोळ्यांमधील एकूण 18 आरोपींना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
अलीकडच्या काळात नंदुरबार शहर परिसरात काही गट आक्रमक वर्तन करत असल्याची नोंद झाली होती. त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, विनयभंग, शासकीय कामात अडथळा, गुन्हेगारी कट, जातीय दंगल, बेकायदेशीर जमाव, दंगल, चोरी, धमकी, गंभीर दुखापत, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान असे गुन्हे समाविष्ट आहेत. सतत सुरू असलेल्या या गुन्हेगारीमुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर प्राधिकरण अधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 वापरून दोन्ही टोळ्यांतील टोळीप्रमुखांसह 18 आरोपींना दोन वर्षांसाठी जिल्हाबाहेर हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.
हद्दपार आरोपींची माहिती अशी...
पहिली टोळी:
बबलु काल्या ऊर्फ शेख शाहेबाज शेख शरफुद्दीन (31), सलाम लतिफ शेख (25), शेख शाहरुख बाबु कुरेशी (29), सलमान खान जमालखान पठाण (32), कैफ अब्दुल रहेमान (26), साहिल ऊर्फ मस्तान रोकडा युसूफ शहा (21), फहीम मोहम्मद शेख (35), रियाज सैय्यद ऊर्फ रियाज लंबा (35), पिंट्या ऊर्फ रेहानउद्दीन काझी (31), कुरेशी नबील जलील (26), सर्फराज ऊर्फ मांजऱ्या बेलदार (21), साबीर मोहम्मद ऊर्फ काल्या भिस्ती (21), जाकीर आरिफ भिस्ती (22), अलबक्ष फकिरा शेख (21), नविद ऊर्फ उपाधी फकिरा कुरेशी (19).
दुसरी टोळी:
सद्दाम शेख अजिज शेख (33), शेख शाहरुख शेख अजिज (28), रेहेमान शरिफ मिस्तरी (25).