Nandurbar Bomb Threat | नंदुरबारमध्ये खळबळ : डाक, पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

प्रमुख डाक कार्यालयात भोवताली तसेच पासपोर्ट कार्यालय परिसरातील पोलिसांनी गराडा घातल्यामुळे सर्वत्र खळबळ
Bomb Threat
Bomb ThreatFile Photo
Published on
Updated on

Post Office bomb threat Nandurbar

नंदुरबार : डाक कार्यालय आणि पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवून देऊ; अशी धमकी ईमेल द्वारे प्राप्त झाल्याचे कळताच नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने अत्यंत वेगाने झाडाझडती सुरू केली. ते पाहून नंदुरबार मात्र पूर्णतः हादरून गेले.

बुधवारी (दि. 25) नंदुरबारच्या प्रमुख डाक कार्यालयात भोवताली तसेच पासपोर्ट कार्यालय परिसरातील पोलिसांनी गराडा घातल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यभरातील डाक कार्यालय उडवण्याची धमकी अज्ञाताने दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षतेचा भाग म्हणून नंदुरबार मध्ये देखील कसून तपासणी करण्यात आली.

Bomb Threat
Nandurbar Grampanchayt election | नंदूरबार जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर

विभागीय कार्यालयाच्या वतीने नंदुरबारच्या डाक कार्यालयाला माहितीसाठी ईमेल फॉरवर्ड करण्यात आला. तसेच नंदुरबार शहरातील दीनदयाल चौकातील डाक कार्यालयात चोख बंदोबस्त लावून बॉम्ब शोध पथकाच्या माध्यमातून कार्यवाही सुरू करण्यात आली. तपासणीसाठी काही काळ पोलीस पथकांनी परिसराचा ताबा घेतला होता.

या दरम्यान सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या बाहेर हलवण्यात आले होते. डाक कार्यालयात कुणालाही प्रवेश न देता चहू बाजूने पोलीस पथकांनी इमारतीची तपासणी केली. दुपारपर्यंत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये कोणतीही आक्षेपाहर्य वस्तू सापडली नसली तरीही पोलीस दल परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. तपासणी मोहिमेत आतापर्यंत कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आलेली नसल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news