Student Death Akkalkuwa | अक्कलकुवा जवाहर नवोदय विद्यालयातील १५ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

वसतिगृहाच्या खोलीत बेशुद्धावस्थेत आढळली; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार
 Death
Death Pudhari Photo
Published on
Updated on

Jawahar Navodaya Vidyalaya Student Death Akkalkuwa

नंदुरबार : अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. निहारिका अनिल कोळी (वय १५, रा. शहादा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण समोर येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निहारिका सकाळच्या सुमारास वसतिगृहातील खोलीत जमिनीवर बेशुद्धावस्थेत आढळून आली. ही बाब निदर्शनास येताच विद्यालय प्रशासनाने तिला तातडीने अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

 Death
Nandurbar News : मक्याच्या पिकात गांजाची शेती; २ कोटी २१ लाखांचा गांजा जप्त!

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच अक्कलकुवा पोलिस ठाण्याचे निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, निहारिकाच्या मृत्यूची माहिती मिळताच तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. ग्रामीण रुग्णालय परिसरात आई-वडील आणि नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. या घटनेमुळे जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थी आणि पालकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच विद्यार्थिनीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

 Death
Nandurbar News | नंदुरबारमधील १३ रस्त्यांच्या कामांवर खंडपीठाची नगरविकास विभागाला नोटीस; निधी गैरव्यवहाराचा आरोप ऐरणीवर

अभिजीत दिपके यांच्याकडून सांत्वन

दरम्यान, काक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके हे नंदुरबार दौऱ्यावर असताना त्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली. तसेच मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news