धक्कादायक! व्हाट्सअप ग्रुपद्वारे हॉटेल मालकाला ६७ लाखाचा गंडा

धक्कादायक! व्हाट्सअप ग्रुपद्वारे हॉटेल मालकाला ६७ लाखाचा गंडा

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : फेसबुक अथवा व्हाट्सअपद्वारे लोकांना गुंतवणुकीला भाग पाडून गंडा घालण्याचा नवा फंडा सध्या सुरू आहे. अक्कलकुवा तालुक्यातील खापर शहरातील एका हॉटेल मालकाला व्हाट्सअपद्वारे ६७ लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार सोमवारी (दि.१४) उघडकीस आला. याप्रकरणी तीन ग्रुप ॲडमिन विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून सायबर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, खापर येथील नारायणदादानगर मधील रहिवासी हॉटेल मालक नासीर लुकमन खान (वय ५६) हे मणक्याच्या आजारामुळे अंथरुणावर पडून होते. पडल्या पडल्या वेळ घालवायचा म्हणून ते व्हाट्सअप आणि फेसबुकवर रमायला लागले. अशातच फेसबुकवरील एका ग्रुपशी त्यांचा संपर्क झाला. अमूक रक्कम गुंतवल्यास इतक्या टक्के व्याजाने परतावा मिळेल, अशा स्वरूपाची माहिती वाचल्यावर ते अधिक खोलात शिरत गेले. त्यातूनच काही व्हाट्सअप ग्रुपशी संपर्क झाला. त्या ठिकाणी अन्य इतर बरेच लोक रक्कम गुंतवत आहेत आणि त्यांना वेळोवेळी मोठा नफा मिळत आहे,अक्कलकुवा तालुक्यातील खापर शहरातील हॉटेल असे वारंवार त्यांना पाहायला मिळाले आणि आपसूकच नासिर खान यांनी स्वतःची रक्कम पाठवून गुंतवणूक करायला सुरुवात केली. संबंधित एडमिन रक्कम जमा होत असल्याची खोटी माहिती ग्रुपवर टाकत राहिले. याविषयी दिलेल्या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, संबंधित व्हॉटसऍप ग्रुप अॅडमीन यांच्या बँक अकांऊटवर त्यांनी १ जानेवारी २०२४ रोजी पासून ते ११ जून २०२४ पर्यंत वेळोवेळी ६७ लाख १ हजार रुपये जमा केले. परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे कधीही परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी नंदुरबार पोलिस ठाण्यात धाव घेत ग्रुप ॲडमिन श्रीया अकेला, अनुराग ठाकूर व रोनक या तिघांविरुद्ध तक्रार देत गुन्हा दाखल केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news