मुलाच्या प्रेम प्रकरणातून 'ब्लॅकमेल' केल्याने वडिलांनी संपविले जीवन

नंदुरबार येथील घटना
Nandurbar Crime News
मुलाच्या प्रेम प्रकरणातून 'ब्लॅकमेल' केल्याने मुलाच्या बापाने आपले जीवन संपविले. File Photo
Published on
Updated on

नंदुरबार : प्रेम प्रकरणातील मुलीशी तुमच्या मुलाला लग्न करायला सांगा, असा तगादा मुलाच्या वडिलांना लावण्यात आला. तसेच दहा लाखाची मागणी करत पैसे न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. या प्रकाराला कंटाळून मुलाच्या वडिलांनी बुधवारी (दि.२) झाडावर गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. कनिलाल मांगिलाल गावीत (वय ४९) असे मृताचे नाव आहे.

Nandurbar Crime News
Ek Daav Bhootacha | भूताला मुक्ती, तर तरुणाला प्रेम मिळवण्यासाठीचा रंजक प्रवास

मृत कनिलाल गावीत यांच्या मुलाचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. या प्रेमप्रकरणावरून तुमच्या मुलाला मुलीशी लग्न करायला सांगा, असा तगादा मुलाच्या वडिलांना लावण्यात आला. त्याचबरोबर त्यांना दहा लाखाची मागणी करत ब्लॅकमेल करण्यात आले. वारंवार पैशाची वाढवून मागणी करत पैसे न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिल्याने या त्रासाला कंटाळून मुलाच्या वडिलांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी बुधवारी गावातील झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी मृताच्या मुलांने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. याबाबत अधिक तपास प्रभारी अधिकारी विवेक पाटील करत आहेत.

Nandurbar Crime News
प्रेम केले; पण जातीमुळे दिला लग्नास नकार, अखेर प्रेयसीने...

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news