प्रेम केले; पण जातीमुळे दिला लग्नास नकार, अखेर प्रेयसीने...

Chhatrapati Sambhajinagar News | अभियांत्रिकीच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा
Chhatrapati Sambhajinagar girlfriend ends life
प्रेम केले; पण जातीमुळे दिला लग्नास नकारfile photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : ती बीएएमएसची विद्यार्थिनी... तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी... अकरावीपासून दोघांची चांगली मैत्री... त्यांच्यात प्रेमसंबंधही जुळले; पण लग्नाचा विषय निघाल्यावर प्रियकराने थेट जातीमुळे नकार दिला. त्यातून त्यांच्या प्रेमात कटुता आली. काही आक्षेपार्ह बाबींवरून वादही झाला. त्यातूनच प्रेयसीने सलीम अली सरोवरामध्ये उडी घेऊन जीवन संपवले. २२ ऑगस्टला तिचा मृतदेह आढळला. २३ ऑगस्टला तिच्या कुटुंबीयांनी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

अपूर्वा दिलीप गजहंस (वय २१, रा. राणा पेट्रोल पंपाच्या मागे, पडेगाव) असे मृत विद्यार्थिनीचे, तर किरण कांबळे (२१) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी अपूवनि किरणसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती तिच्या आईला दिली होती. तिच्या आईने किरणला बोलावून दोघे लग्न करणार का? अशी विचारणा केली होती; पण तेव्हा किरणने दोघांची जात वेगवेगळी असल्याचे सांगून लग्नाला थेट नकार दिला होता. तेव्हाच अपूर्वाच्या आईने किरणला समजावून सांगत लग्न करायचे नसेल तर अपूर्वाशी कसलाही संबंध ठेवू नको. तिही तुझ्या संपर्कात राहणार नाही, असे सांगितले होते. तरीही किरण तिच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत होता. अपूर्वान नकार दिल्यावरही त्याच्याकडे असलेल्या काही आक्षेपार्ह बाबींवरून तो तिला त्रास द्यायला लागला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Chhatrapati Sambhajinagar girlfriend ends life
पीटी शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news