जळगावी रामदास कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

पारोळा : रामदास कदम यांच्या विरोधात आंदोलन करताना डॉ. हर्षल माने, प्रा. आर. बी. पाटील, अशोक मराठे, दादा पाटील, सुनील पवार आदी. (छाया : चेतन चौधरी)
पारोळा : रामदास कदम यांच्या विरोधात आंदोलन करताना डॉ. हर्षल माने, प्रा. आर. बी. पाटील, अशोक मराठे, दादा पाटील, सुनील पवार आदी. (छाया : चेतन चौधरी)
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात असभ्य भाषा वापरणाऱ्या रामदास कदम यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. पारोळा शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कदम यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारत जाळून जाहीर निषेध नोंदवण्यात आला.

शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात येऊन जाहीर निषेध व रास्ता रोको करण्यात आला. शिवसेनेमुळे रामदास कदम यांना ओळख मिळाली, मंत्रिपद मिळाले. त्याच शिवसेनेची गद्दारी करून आणि ज्यांच्या जिवावर मोठा होऊन कदम बोलत असल्याने हे चुकीचे असल्याचे डॉ. हर्षल माने यांनी सांगितले.

प्रतिमा जाळून निषेध…

शिवसेना महाराष्ट्रात अशा घटना खपवून घेणार नाही. जो कोणी असे वागत असेल तर त्याला शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल, असेही माने म्हणाले. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर रामदास कदम यांच्या प्रतिमा जाळून त्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख प्रा. आर. बी. पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे, उपतालुका प्रमुख दादा पाटील, जिल्हाध्यक्ष एकलव्य सेना सुनील पवार, युवा सेना तालुकाप्रमुख रवींद्र पाटील आदी कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news