जळगाव जिल्ह्यातील 270 जणांचे शस्र परवाने रद्द, 50 निशाण्यावर

जळगाव जिल्ह्यातील 270 जणांचे शस्र परवाने रद्द, 50 निशाण्यावर
Published on
Updated on

जळगाव- जिल्ह्यात देण्यात आलेल्या शस्त्र परवान्यांची पडताळणी जिल्हा प्रशासनाने गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू केलेली आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी यांनी जवळपास अडीच ते तीन तास सह्यांचा कार्यक्रम राबवून 270 जणांचे परवाने रद्द करण्याचे आदेश जारी केले.

जिल्हा प्रशासन एकीकडे लोकसभेच्या तयारी मध्ये गुंतलेले असताना जिल्हा प्रशासनाचे अधिकारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी जिल्ह्याभरात देण्यात आलेल्या शस्त्र परवान्यांची पडताळणी सुरू केली आहे. या पडताळणीमध्ये त्यांनी परवानाधारकांना नोटीस बजावून त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी सुद्धा दिली. संपूर्ण कागदपत्र पडताळणी करण्यात आली. या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमोर जिल्ह्यातील 270 परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. तर पुढील काही दिवसांमध्ये पन्नास जण परवाने रद्द करण्याच्या टारगेटमध्ये आहेत.

270 परवानांची कागदपत्रे तपासणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यासमोर रद्द करण्यासाठी ठेवलेल्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी अडीच ते तीन तास सह्या करून सदरचे परवाने रद्द केले.

या 270 रद्द करण्यात आलेल्या परवानांमध्ये मयत झालेल्यांची संख्या 110 आहे. आढळून आलेले 42, मुदतीमध्ये नूतनीकरण न करणारे 18, वय वृद्ध परवानाधारक 16, विनंतीनुसार रद्द केलेले 19, सुनावणीस गैरहजर असलेले 62, गुन्हे दाखल असलेले दोन व नोटीस न स्वीकारणारे एक असे एकूण 270 जणांचे शस्त्र प्रमाणे रद्द करण्यात आलेले आहे.

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news